लघुशंकेचा बहाणा, पाथर्डी बलात्काराच्या आरोपीचं बेड्यांसह पलायन

पुरानं वाहतूक ठप्प झाल्याची संधी साधत मोईनने लघुशंकेचा बहाणा केला आणि खाली उतरला. त्यानंतर पोलिसांना झटका देऊन शेखनं बेड्यांसह पलायन केलं.

By: | Last Updated: 21 Sep 2017 11:04 AM
लघुशंकेचा बहाणा, पाथर्डी बलात्काराच्या आरोपीचं बेड्यांसह पलायन

अहमदनगर : मुसळधार पावसामुळे अहमदनगरमध्ये उद्भवलेल्या पूरपरिस्थितीचा फायदा उचलत पाथर्डी बलात्कार प्रकरणातील आरोपीने पलायन केलं आहे. वाहतूक कोंडीत बस अडकल्यावर लघुशंकेच्या बहाण्याने आरोपीने बेडीसह पोबारा केला.

भैय्या उर्फ मोईन गुलाब शेख हा आरोपी बेड्यांसकट फरार झाला आहे. शेख हा पाथर्डीतल्या बलात्कार प्रकरणातील आरोपी आहे.

शेखला सुनावणीसाठी पाथर्डीहून नगर जिल्हा सत्र न्यायालयात नेण्यात आलं होतं. सुनावणीनंतर परतताना बुधवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास होती. कल्याण-विशाखापट्टणम मार्गावरील मेहकरीला पुलावरुन मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होतं. त्यामुळे मेहकरीजवळ मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.

पुरानं वाहतूक ठप्प झाल्याची संधी साधत मोईनने लघुशंकेचा बहाणा केला आणि खाली उतरला. त्यानंतर पोलिसांना झटका देऊन शेखनं बेड्यांसह पलायन केलं. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV