अहमदनगरमध्ये माजी सैनिकासह संपूर्ण कुटुंबाची निर्घृण हत्या

अहमदनगरमध्ये माजी सैनिकासह संपूर्ण कुटुंबाची निर्घृण हत्या

अहमदनगर : माजी सैनिकाच्या संपूर्ण कुटुंबाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. अहमदनगरमधून काळजाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे.

नगरमधील शेगाव तालुक्यात राहणारे 57 वर्षीय आप्पासाहेब हरवणे, त्यांची पत्नी सुनंदा हरवणे (45), मुलगी स्नेहील (18) आणि मुलगा मकरंद (15) यांची निर्घृण हत्या करण्यात आली.

रविवारी सकाळी दूध घेण्यासाठी घरातल्या कुणीच दरवाजा उघडला नाही. त्यामुळे शेजाऱ्यांनी खिडकीतून  डोकावून बघितलं असता हरवणे कुटुंबांची हत्या झाल्याचं उघड झालं.

पोलिसांनी घटनास्थळी श्वान पथकाच्या मदतीनं तपासाला सुरुवात केली आहे. मात्र संपूर्ण कुटुंबांची हत्या का करण्यात आली या प्रश्नाचं गूढ उकललेलं नाही.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV