श्रीरामपूरजवळ तीन गाड्या एकमेकांवर आदळल्या, पाच मृत्यूमुखी

बेलापूर-श्रीरामपूर रोडवर आज पहाटे हा भीषण अपघात झाला. स्विफ्ट कार, दुधाचा टँकर आणि इंडिका कार एकमेकांवर धडकली.

श्रीरामपूरजवळ तीन गाड्या एकमेकांवर आदळल्या, पाच मृत्यूमुखी

अहमदनगर : शिर्डीमध्ये तीन गाड्यांचा भीषण अपघात झाला. या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.

बेलापूर-श्रीरामपूर रोडवर आज पहाटे हा भीषण अपघात झाला. स्विफ्ट कार, दुधाचा टँकर आणि इंडिका कार एकमेकांवर धडकली. मात्र यामध्ये स्विफ्ट गाडीतील पाच जणांचा मृत्यू झाला.

ओव्हरटेक करण्याच्या नादात अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. मात्र धुक्यामुळे अपघात झाला काय यादृष्टीनेही पोलिस तपास सुरु आहे.

मृतांमधील दोन जण श्रीरामपूरमधील भैरवनाथजवळचे रहिवाली होते. तर उर्वरित मृतांची ओळख पटवण्याचं काम सुरु आहे.

दरम्यान, जखमींना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Ahmednagar : Five died as 3 vehicles collide near Shrirampur
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV