नगरमध्ये निवृत्त जवानाचं कुटुंब संपवणारा मुख्य आरोपी अटकेत

अहमदनगरमधील कर्जत तालुक्यातल्या आखणी गावातून परसिंगला ताब्यात घेण्यात आलं. तो चार जिल्ह्यांमध्ये वाँटेड होता.

By: | Last Updated: 12 Aug 2017 09:31 PM
नगरमध्ये निवृत्त जवानाचं कुटुंब संपवणारा मुख्य आरोपी अटकेत

अहमदनगर : अहमदनगरमधील शेवगावमध्ये निवृत्त जवानासह कुटुंबातील चौघांची निर्घृण हत्या करणाऱ्या मुख्य आरोपीला पोलिसांनी जेरबंद केलं आहे. 29 वर्षीय आरोपी परसिंग भोसलेला अटक करण्यात आली आहे.

अहमदनगरमधील कर्जत तालुक्यातल्या आखणी गावातून परसिंगला ताब्यात घेण्यात आलं. तो चार जिल्ह्यांमध्ये वाँटेड होता. आबासाहेब हरवणे कुटुंबातील चौघांच्या हत्याकांडाप्रकरणी आतापर्यंत पाच आरोपी अटकेत आहेत.

दरोड्यासाठी निवृत्त सैनिकासह अख्खं कुटुंब संपवलं, दोघांना अटक


दरोड्याच्या उद्देशाने हरवणे कुटुंबातील चौघांची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक कबुली आरोपींनी दिली होती.

17 जूनला शेवगावात राहणारे 57 वर्षीय आप्पासाहेब हरवणे, त्यांची पत्नी सुनंदा हरवणे (45), मुलगी स्नेहल (18) आणि मुलगा मकरंद (15) या चौघांची राहत्या घरी हत्या झाली होती. या घटनेनं संपूर्ण नगर जिल्हा हादरला होता.

अहमदनगरमध्ये माजी सैनिकासह संपूर्ण कुटुंबाची निर्घृण हत्या


सकाळी दूध घेण्यासाठी घरातल्या कुणीच दरवाजा उघडला नाही. त्यामुळे शेजाऱ्यांनी खिडकीतून डोकावून बघितलं असता हरवणे कुटुंबांची हत्या झाल्याचं उघड झालं.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV