अहमदनगर पोलिसांकडून 60 लाखांचे फटाके खरेदी

पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी पोलिसांना दिवाळीसाठी एक हजाराचे फटाके खरेदी करण्याचा फतवा काढला. जिल्ह्यातील तालुका पोलीस ठाण्यातही फटका विक्री करण्यात येणार आहे.

Ahmednagar police bought fire crackers worth 60 lakh rupees

अहमदनगर : सरकारकडून प्रदूषणमुक्त दिवाळीसाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. मात्र अहमदनगरच्या पोलीस अधीक्षकांनी सरकारच्या उपक्रमाला हरताळ फासला आहे. पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी पोलिसांना दिवाळीसाठी एक हजाराचे फटाके खरेदी करण्याचा फतवा काढला. जिल्ह्यातील तालुका पोलीस ठाण्यातही फटका विक्री करण्यात येणार आहे.

अहमदनगर पोलीसांकडून तब्बल साठ लाखांचे फटाके खरेदी करण्यात आले आहेत. नागपूरच्या उमसान एन्टरप्राईजेस कंपनीकडून तब्बल पाच हजार फटाका बॉक्स खरेदी करण्यात आले.

पोलिसांना एक हजार पन्नास रुपये, तर नागरिकांना एक हजार चारशे दहा रुपयाने विक्री होणार आहे. तर पोलिसांच्या पगारातून पैसे कपात करण्यात येतील. हा पैसा पोलीस कल्याण निधीसाठी वापरण्यात येणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.

पोलीस मुख्यालयात फटाके उतरवण्यासाठी दहा पोलीस तैनात आहेत. तर त्याचबरोबर तालुका स्तरीय पोलीस ठाण्यात फटका स्टॉलही लावण्यात येणार आहेत. तालुका पोलीस ठाण्यात फटाका विक्रीसाठी आठ पोलीसांचं नियोजन आहे.

दिवाळीतील फटकेबाजी हा प्रत्येकाचा ऐच्छिक विषय आहे. अनेक पोलीस फटाके वाजवत नाहीत. मात्र पोलीस अधीक्षकांच्या फतव्याने नाईलाजाने त्यांना आर्थिक भुर्दंड बसणार आहे. शिवाय कायदा आणि सुव्यवस्था राखणारे पोलिसच आता फटाके विक्री करणार आहेत.

Maharashtra News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:Ahmednagar police bought fire crackers worth 60 lakh rupees
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

उद्धव ठाकरेंची मध्यस्थी, एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटण्याची शक्यता
उद्धव ठाकरेंची मध्यस्थी, एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटण्याची शक्यता

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या

अहमदनगर:  या पेटीत मगर आहे
अहमदनगर: या पेटीत मगर आहे

अहमदनगर: शेवगाव तालुक्यात बारा फूट लांबीची मगर पकडण्यास यश आलं.

एसटी कर्मचाऱ्यांना विश्रामगृहातून अर्धनग्न अवस्थेत हाकललं
एसटी कर्मचाऱ्यांना विश्रामगृहातून अर्धनग्न अवस्थेत हाकललं

सोलापूर: पगारवाढीसाठी घरदार सोडून आंदोलन करणाऱ्या एसटी

एसटी कर्मचाऱ्यांबाबत उद्धव ठाकरेंची भूमिका दुटप्पी : अशोक चव्हाण
एसटी कर्मचाऱ्यांबाबत उद्धव ठाकरेंची भूमिका दुटप्पी : अशोक चव्हाण

नांदेड : ‘अंगणवाडी सेविकांचा प्रश्न जसा महत्वाचा आहे, तसाच एसटी

एसटी संप चौथ्या दिवशीही सुरुच
एसटी संप चौथ्या दिवशीही सुरुच

मुंबई: एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज सलग चौथा दिवस आहे. एसटी

धुळ्यात दोन फटाक्यांच्या दुकानाला भीषण आग, एकजण गंभीर जखमी
धुळ्यात दोन फटाक्यांच्या दुकानाला भीषण आग, एकजण गंभीर जखमी

धुळे : धुळ्यात फटाक्यांच्या दुकानाला भीषण आग लागल्यानं दिवाळीच्या

आता तरी दिवे लावा, पांझरा कान साखर कारखान्यासाठी तरुणांचं आंदोलन
आता तरी दिवे लावा, पांझरा कान साखर कारखान्यासाठी तरुणांचं आंदोलन

साक्री (धुळे) : गेल्या 20 वर्षांपासून बंद असलेल्या ‘श्री पांझरा कान

उद्धव ठाकरेंचं एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष का? : इंटकचा सवाल
उद्धव ठाकरेंचं एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष का? :...

मुंबई : एसटी संपाचा आजचा तिसरा दिवस असून, कर्माचाऱ्यांच्या

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 19/10/2017
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 19/10/2017

1. राज्यभर एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन तीव्र, धुळ्यात अर्धनग्न

"एसटी कर्मचाऱ्यांना विश्रांतीगृहाबाहेर काढा आणि गुन्हे दाखल करा"

सोलापूर : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज तिसरा दिवस आहे. अद्यापही