कामाचा बोजा आणि पत्नीच्या त्रासाने केस गेले : अजित पवार

केस गळतीचा संबंध अजित पवारांनी बारामतींसाठी केलेल्या कामाचा बोजा आणि पत्नीच्या त्रासाशी जोडला.

कामाचा बोजा आणि पत्नीच्या त्रासाने केस गेले : अजित पवार

इंदापूर : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार हे त्यांच्या रांगड्या स्वभावासाठी आणि बेधडक वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहेत. बारामतीच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा याची प्रचिती आली. फेटा फारसा न बांधण्याचं रहस्य अजित पवारांनी सांगितलं आणि उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

केस गळतीचा संबंध अजित पवारांनी बारामतींसाठी केलेल्या कामाचा बोजा आणि पत्नीच्या त्रासाशी जोडला. अजित पवारांचं बिनधास्त वक्तव्य ऐकून उपस्थितांची हसूनहसून पुरेवाट झाली.

काय म्हणाले अजित पवार?

'मी तर कधी फेटा बांधत नाही तुम्हाला माहित आहे. पण तुम्ही फेटा बांधल्यावर मलाही राहवलं नाही, म्हटलं बांध बाबा, आता काय करु? कारण फेटा बांधायला आता केस पण राहिले नाहीत की काय, सगळे केस गेले, तुमच्यासाठी काम करता करता माझे केस पण गेले. सुनेत्राला म्हणत असतो आता माझे केस बारामतीकरांकरता गेले, का तुझ्यामुळे गेले बघ आता. गमतीचा भाग जाऊद्या'

पाहा व्हिडिओ :

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Ajit Pawar connects hair loss with wife’s annoyance and work load latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV