मतदार भाजप आणि शिवसेनेला त्यांची जागा दाखवतील : अजित पवार

‘जनता आता दूधखुळी राहिलेली नाही, त्यामुळे भाजप आणि शिवसेनेला मतदार जागा दाखवतील’, अशा शब्दात माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी टीका केली.

मतदार भाजप आणि शिवसेनेला त्यांची जागा दाखवतील : अजित पवार

 

कराड : ‘जनता आता दूधखुळी राहिलेली नाही, त्यामुळे भाजप आणि शिवसेनेला मतदार जागा दाखवतील’, अशा शब्दात माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी टीका केली.

नेमकं काय म्हणाले अजित पवार?

'शिवसेनेची दुटप्पी भूमिका आहे. एकीकडे सत्तेत बसायचं, दुसरीकडे विरोध करायचा आणि लोकांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करायचा. पण जनता काही ऐवढी दूधखुळी नाही. जनतेला काही समजत नाही असं काही समजण्याचं अजिबात कारण नाही. महाराष्ट्रातील जनता प्रचंड हुशार आहे. आम्ही कसं वागतो, काय बोलतो याकडे अतिशय बारकाईनं लक्ष देतात. त्यामुळे निवडणुकीत कुठं बटण दाबायचं तिथं ते बरोबर दाबतात. शिवसेनेला सत्तेची ऊबही हवी आहे आणि विरोधकांची स्पेस देखील. सगळंच आधाशासारखं घेण्याचा त्यांचा केविलवाणा प्रयत्न आहे.' अशी टीका त्यांनी शिवसेनेवर केली.

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांच्या ३३व्या पुण्यतिथीनिमित्त चव्हाणांच्या स्मृतीस्थळांचं सत्ताधाऱ्यांसह अनेक नेत्यांनी दर्शन घेतलं. यावेळी अजित पवार, पृथ्वीराज चव्हाण यांनी शिवसेना आणि भाजपच्या धोरणावर टीका केली.

VIDEO: 

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Ajit Pawar criticized on shivsena in karad latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV