25 वर्षाच्या प्रवासानंतर अकलूज लावणी स्पर्धेचे घुंगरु शांत होणार

खेडोपाडी जत्रेच्या आणि तमाशाच्या फडावर बदनाम झालेल्या लावणीला अकलूजच्या स्पर्धेने मोठा मान-सन्मान मिळाला. पैसे प्रसिद्धी सगळी मिळाले. पण आता लावणीचे माहेरघर म्हणून ओळखले जाणाऱ्या अकलूजच्या या लावणी स्पर्धा आता बंद होणार आहे.

25 वर्षाच्या प्रवासानंतर अकलूज लावणी स्पर्धेचे घुंगरु शांत होणार

पंढरपूर : खेडोपाडी जत्रेच्या आणि तमाशाच्या फडावर बदनाम झालेल्या लावणीला अकलूजच्या स्पर्धेने मोठा मान-सन्मान मिळाला. पैसे प्रसिद्धी सगळी मिळाले. पण आता लावणीचे माहेरघर म्हणून ओळखले जाणाऱ्या अकलूजच्या या लावणी स्पर्धा आता बंद होणार आहे.

अकलूजच्या लावणी मोहोत्सवाने महाराष्ट्राच्या लोककलेला खऱ्या अर्थाने ओळख मिळाली. मोठमोठ्या शहरातील वातानुकूलित रंगमंचावर शेकडो रुपयांच्या तिकीटावर मानाने सादर होऊ लागली. त्यामुळे लावणी कलावंतांकडे बघण्याची समाजाची दृष्टी बदलली. तसेच या स्पर्धेमुळे राज्यात जवळपास 250 पेक्षा जास्त लावणीचे व्यावसायिक लावणी पथके तयार झाली. येथील कलावंत हिंदी आणि मराठी चित्रपटात आणि मालिकांमधून नायिका म्हणून पुढे येऊ लागल्या.

अशा हजारो कलावंतांना समाजात मान मिळवून देणारी अकलूजच्या ही लावणी स्पर्धा बंद होणार आहे. त्यामुळे या शेवटच्या स्पर्धेत आपली ओळख दाखवण्यासाठी हे नवीन कलावंत कंबर कसून तयारीला लागले आहेत.

या स्पर्धेच्या निमित्ताने लावणी पथकांचा गायिका, वादक, नृत्यांगना असा जवळपास 20 लोकांचा लवाजमा सांभाळावा लागतो. यासाठी किमान लाखभर रुपये खर्च होतात. मात्र आयोजकांना एवढा खर्च पेलणे दिवसेंदिवस कठीण जाऊ लागल्याने स्पर्धा बंद करण्याच्या मानसिकता बनत असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात येत आहे.

दरम्यान, ही स्पर्धा बंद होण्याचा हा धक्का केवळ लावणी कलावंतानाच नाही, तर रसिकांनाही बसला आहे. पण महाराष्ट्राच्या संस्कृतीच्या पायातील ही चाळ आता अशीच खंबीरपणे पुढे नेण्यासाठी हे कलावंत दुसऱ्या अकलूजवर नजर लावून बसलेत आहेत.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: lavni mohotsav will
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV