बैलगाडा शर्यत : पेटा संस्थेविरोधात सर्वपक्षीय नेत्यांचं आंदोलन

राज्यात बैलगाडा शर्यती पुन्हा सुरु करण्यासाठी सर्वपक्षीय नेते एकत्रित झाले आहेत. बैलगाडा शर्यतीसाठी चाकण चौकात जोरदार आंदोलन आज केलं जाणार आहे. तसंच पेटा संस्थेविरोधात राज्यव्यापी आंदोलनही छेडलं जाणार आहे.

बैलगाडा शर्यत : पेटा संस्थेविरोधात सर्वपक्षीय नेत्यांचं आंदोलन

पुणे : राज्यात बैलगाडा शर्यती पुन्हा सुरु करण्यासाठी सर्वपक्षीय नेते एकत्रित झाले आहेत. बैलगाडा शर्यतीसाठी चाकण चौकात जोरदार आंदोलन आज केलं जाणार आहे. तसंच पेटा संस्थेविरोधात राज्यव्यापी आंदोलनही छेडलं जाणार आहे.

आजच्या चाकण चौकातील आंदोलनात भाजप आमदार महेश लांडगे, शिवसेना खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्यासह इतर नेतेही सहभागी होणार आहेत.

राज्यात बैलगाडा शर्यती सुरु व्हाव्या यासाठी सरकारनं अध्यादेश काढला होता. तसंच प्राण्यांना इजा न होता, शर्यती घ्याव्या असंही सुचवलं होतं.

मात्र त्याविरोधात पेटा सामाजिक संस्थेनं न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे बैलगाडा शर्यतींना पुन्हा एकदा खीळ बसली होती.

दरम्यान पिंपरी चिंचवड शहर आणि जिल्हा बैलगाडा मालक चालक संघटनेची भाजप आमदार महेश लांडगे यांनी याच आठवड्यात आयोजित केलेली बैठक निष्फळ ठरली. आमदार लांडगे यांनी शर्यतीवरील बंदी उठवण्यासाठी बैठक घेतली. मात्र मुख्य मुद्दा बाजूला ठेवत, बैलगाडा मालक-चालकांची मनधरणी केली आणि सरकारवर अविश्वास दाखवून त्या विरोधी आंदोलन करु नका तर न्यायालयात गेलेल्या प्राणी मित्रांविरोधात आंदोलन छेडा असं आवाहन लांडगे यांनी केलं.

हे आवाहन करताना लांडगे यांच्या तोंडून प्राणीमित्रांबद्दल अपशब्दही उच्चारला गेला.

काय आहे पेटा?

पेटा ही एक प्राण्यांसंबंधी काम करणारी संस्था आहे. पिपल फॉर द इथिकल ट्रिटमेंट ऑफ एनिमल (People for the Ethical Treatment of Animals) प्राण्यांच्या अधिकार आणि हक्कांसाठी लढणारी एक संस्था आहे.

पेटा संस्थेचं मुख्यालय अमेरिकेतील व्हर्जिनियाच्या नॉर्फोकमध्ये असून जगभरात 20 लाखांहून जास्त सदस्य या संस्थेसाठी काम करतात, असा संस्थेचा दावा आहे. इन्ग्रिड न्यूकिर्क या संस्थेचे अध्यक्ष आहेत.

पेटा या संस्थेला मलायका अरोरा, शाहीद कपूर, महिमा चौधरी, सनी लिओनीसारख्या सेलिब्रेटींनी पाठिंबा दर्शवला आहे.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: all party leaders protest for bailgada race latest marathi news updates
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV