ना पासवर्ड दिला ना ओटीपी, बँक खात्यातून साडेआठ लाख लंपास

अमरावती शहरातल्या 'स्टेट बँक ऑफ इंडिया' आणि 'बँक ऑफ इंडिया' या दोन बँकांमधल्या 9 खातेदारांनी ही तक्रार केली आहे.

ना पासवर्ड दिला ना ओटीपी, बँक खात्यातून साडेआठ लाख लंपास

अमरावती : बँक खात्यातून तब्बल 8 लाख 60 हजार रुपये लंपास झाल्याची घटना अमरावती शहरात घडल्याने खळबळ उडाली आहे. पासवर्ड किंवा ओटीपी शेअर न करताही झालेल्या या चोरीमुळे खातेदारांसह बँक कर्मचारीही चक्रावले आहेत.

अमरावती शहरातल्या 'स्टेट बँक ऑफ इंडिया' आणि 'बँक ऑफ इंडिया' या दोन बँकांमधल्या 9 खातेदारांनी ही तक्रार केली आहे. यातल्या एकाही खातेदाराने आपला गोपनीय क्रमांक कुणालाही दिला नसल्याचं सांगितलं आहे. तरीही खात्यातून आपोआप रक्कम लंपास झाल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे.

धक्कादायक बाब म्हणजे ही रक्कम हरियाणा, आसाम, गुरुग्राम आणि दिल्लीतल्या एटीएम सेंटरमधून काढलं जात असल्याचं लक्षात आलं आहे. त्यामुळे या हायटेक चोरीच्या फंड्याचा पर्दाफाश करण्याचं आव्हान अमरावतीच्या पोलिसांसमोर आहे.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Amravati : Hightech theft from various bank accounts latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV