अमरावतीत बडतर्फ शिक्षकाकडून विद्यार्थ्याच्या अपहरणाचा बनाव

शाळेतून बडतर्फ झालेल्या आशिष जोशी या शिक्षकाने संबंधित मुलाला आणि पालकांना हाताशी धरुन हे कृत्य केल्याचं पोलिस तपासात पुढे आलं.

अमरावतीत बडतर्फ शिक्षकाकडून विद्यार्थ्याच्या अपहरणाचा बनाव

अमरावती : माजी सहकारी शिक्षकावर सूड उगवण्यासाठी एक विद्यार्थी आणि त्याच्या पालकांना हाताशी धरुन बडतर्फ झालेल्या शिक्षकानेच अपहरणाचा डाव रचला. अमरावतीत घडलेला हा बनाव पोलिसांच्या मदतीने उघडकीस आला.

अमरावतीच्या अचलपूरमध्ये नववीत शिकणारा मुलगा... एक पत्र लिहितो... पत्रात आपल्याला शिक्षकांनी रागावल्यानं आपण घर सोडून जात असल्याचं सांगतो... आई वडील धावत पळत पोलीस ठाण्यात येतात... आणि शिक्षकांविरोधात तक्रार देतात.

इथंपर्यंत शाळेतले शिक्षक चेतन शर्मा हे व्हिलन वाटतात... पोलिस तपास करतात आणि समोर वेगळंच चित्र येतं. शाळेतून बडतर्फ झालेल्या आशिष जोशी या शिक्षकाने संबंधित मुलाला आणि पालकांना हाताशी धरुन हे कृत्य केल्याचं पोलिस तपासात पुढे आलं.
म्हणजे आई-वडिलांनी आपल्याच मुलाच्या अपहरणाचा बनाव केला

शिक्षक आणि विद्यार्थ्यातलं नातं पवित्र असतं. पण त्याला कटकारस्थानांची वाळवी लागली, की या पवित्र नात्याचा डोलारा असा कोसळतो.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Amravati : Suspended teacher fakes kidnapping of student with his parents latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV