अहमदनगरमध्ये स्वतःच्याच मामाच्या मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न

स्वतःच्याच मामाच्या मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंद्यात घडली आहे

अहमदनगरमध्ये स्वतःच्याच मामाच्या मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न

अहमदनगर : स्वतःच्याच मामाच्या मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंद्यात घडली आहे. दरम्यान हे घरगुती प्रकरण असल्याचं सांगत आपापसातच वाद मिटवून घेण्यात आला.

संबंधित मुलगी श्रीगोंद्यात महाविद्यालयीन शिक्षण घेत असून बुधवारी दुपारी बसने घराजवळ उतरली. त्याचवेळी पाठीमागून कारमधून आलेल्या दोघा आतेभावासह तिघांनी जबरदस्तीने तिला गाडीत बसवलं.

भरधाव वेगाने कार पुण्याच्या दिशेने जात होती. रस्त्यात दोन ठिकाणी कारला नागरिकांनी थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनाही दाद न दिल्याने हंगेवाडीत ट्रॅक्टर अडवा लावून तरुणीची सुटका केली.

या कारमधील तिघांना चोप देऊन कारच्या काचा फोडल्या. मात्र घरगुती प्रकरण असल्याने श्रीगोंदा पोलीस ठाण्यात समज देऊन प्रकरण मिटवण्यात आलं. या प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल नाही.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
अधिक माहिती: ahmadnagar kidnapping अपहरण अहमदनगर
First Published:

Related Stories

LiveTV