अहमदनगरमध्ये वाळू तस्करांचा हैदोस, तहसीलदाराला पेटवण्याचा प्रयत्न

पोलीस बंदोबस्तात अवैध वाळू उपसावर कारवाईसाठी गेलेल्या तहसीलदारांना चक्क पेटवण्याचा प्रयत्न पारनेरमधील कोहकडीमध्ये झाला.

अहमदनगरमध्ये वाळू तस्करांचा हैदोस, तहसीलदाराला पेटवण्याचा प्रयत्न

अहमदगनर : अहमदनगरमधील पारनेरमध्ये वाळू तस्करांचा हैदोस सुरु आहे. कारण, पोलीस बंदोबस्तात अवैध वाळू उपसावर कारवाईसाठी गेलेल्या तहसीलदारांना चक्क पेटवण्याचा प्रयत्न पारनेरमधील कोहकडीमध्ये झाला.

बुधवारी अहमदनगरमधील पारनेरमधील कोहकडी तहसीलदार भारती सगरे महसूल विभागाचे अधिकारी आणि पोलीस पथकासह अवैध वाळू तस्करांवर कारवाईसाठी गेल्या होत्या. यावेळी कुकडी नदी पात्रातून एक पोकलेन आणि दोन ट्रक्टरद्वारे अवैध वाळू उपसा सुरु होता.

यावेळी महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी ट्रॅक्टरच्या चाव्या काढून घेत जप्त केला. तर पोकलेन जप्त करण्यासाठी तहसीलदार सागरे स्वत: पोकलेनमध्ये बसल्या. यानंतर तस्करांनी वाळू तस्करांनी मोठा गोंधळ घालण्या सुरुवात केला.

पण तहसीलदारांनी कारवाई सुरुच ठेवल्याने तस्करांनी पोकलेनवर डिझेल ओतून त्यांना पेटवण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी प्रसंगावधान दाखवत, तहसीलदारांना पोकलेनमधून खाली उतरवलं. पण यावेळी तस्करांनी पोलिसांवर दगडफेक करुन जेसीबी आणि ट्रॅक्टर पळवला.

दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी राजू कुरंदळेसह 11 जणांवर गुन्हा दाखल करण्यात केला आहे. यातील राजू हा शिरुर तालुक्यातील माजी सरपंचाचा मुलगा असल्याची चर्चा आहे.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: an attempt to kill on tahsildars who went to take action against illegal sand in Ahmednagar
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV