साहित्य संमेलनाच्या स्थळाला अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा आक्षेप

बुलडाण्याच्या हिवरा आश्रमात होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला अंधश्रद्धा निर्मुलन समितीने आक्षेप घेतला आहे.

साहित्य संमेलनाच्या स्थळाला अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा आक्षेप

मुंबई : आजपर्यंत साहित्य संमेलनं तोंडावर आली की वाद सुरु व्हायचे. यंदा मात्र स्थळाची घोषणा झाली आणि वादाला सुरुवात झाली.

बुलडाण्याच्या हिवरा आश्रमात होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला अंधश्रद्धा निर्मुलन समितीने आक्षेप घेतला आहे. हिवरा आश्रम हा वादग्रस्त शुकदास महाराजांचा असल्याने, त्या ठिकाणी संमेलन घेऊ नये, अशी मागणी अंनिसंनं केली आहे.

अंनिसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष उमेश चौबे यांनी हा आक्षेप घेतला असून, त्यासाठी त्यांनी श्याम मानव यांनी शुकदास महाराजांच्या केलेल्या भांडाफोडचा दाखलाही दिला आहे.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक व संघटक श्याम मानव यांनी याबाबत फेसबुकवर आपला विरोध दर्शवला आहे.

shyam manav-

...म्हणून अंधश्रद्धा निर्मूलन समिताचा विरोध

साहित्य संमेलन भोगीदास आश्रमात? शुकदास महाराजाच्या हिवरा आश्रमात अखिल भारतीय साहित्य संमेलन भरवण्याचा निर्णय महामंडळाने घेतल्याचे कळते. विवेकानंदांसारख्या विवेकी योग्याचे नाव वापरणाऱ्या, पण प्रत्यक्षात 'रजनिशांच्या तंबूतील उंट' असणाऱ्या ढोंगी शुकदास महाराजांच्या आश्रमात साहित्य संमेलन घेऊन साहित्य महामंडळ साहित्य रसिक जनतेसमोर कोणता आदर्श ठेऊ इच्छिते.

दै. लोकमत मध्ये 1984 मध्ये शुकदासाचे ढोंग उघडकीस आणणारे चार लेख मी लिहिले होते. त्यात ब्रह्मचारी असण्याचे सोंग घेणारा हा शुकदास सुंदर मुलींना एकट्यात 'गेल्या जन्मी मी भगवान कृष्ण, तू राधा' असे सांगून कसे फशी पाडून त्यांचे शोषण करत असे हे विस्ताराने लिहिले आहे. 'कृष्णाचे सोंग घेणारा राधेचा शुकदास' कसा श्रद्धेचा फायदा घेऊन फसवतो हे आजही माझ्या 1988 साली प्रसिद्ध झालेल्या 'बुवाबाजी बळी स्त्रियांचा' या पुस्तकात वाचू शकता.

असल्या ढोंगी बाबाला व त्याच्या शोषणाला साहित्य संमेलन प्रतिष्ठा देणार असेल तर अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती सर्व समविचारी पुरोगामी संघटनांच्यासह कडाडून विरोध करेल. संपूर्ण परिसरात 'शुकदासांच्या रासलीला' जाहीर सभांद्वारे पुन्हा जनतेसमोर मांडू आणि रसिकांचे प्रबोधन करू.

श्याम मानव

संस्थापक व संघटक,अ. भा. अंधश्रद्धा निर्मूलन समिती.

संबंधित बातम्या :

91 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं ठिकाण ठरलं!

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV