अनिकेत कोथळेचा खटला उज्ज्वल निकम लढवणार : केसरकर

सांगलीला जाऊन दीपक केसरकर यांनी कोथळे कुटुंबीयांची भेट घेतली.

Aniket kothale case will be give to senior lawyer Ujjwal nikam

मुंबई : अनिकेत कोथळेच्या कोठडीतील मृत्यू प्रकरणाची केस ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांच्याकडे दिली जाणार आहे. शिवाय या प्रकरणाचा सीआयडीकडून तपास सुरु करण्यात आला आहे, अशी माहिती गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.

सांगलीला जाऊन दीपक केसरकर यांनी कोथळे कुटुंबीयांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी मुंबईत आल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही याबाबत माहिती दिली असल्याचं त्यांनी सांगितलं.

कोथळे कुटुंबीयांना दहा लाख रुपये अर्थसहाय्य केलं जाणार आहे. शिवाय साक्षीदार आणि कोथळे कुटुंबीयांना सुरक्षा पुरवण्याचे आदेश दिले असल्याचंही दीपक केसरकर यांनी सांगितलं.

प्रकरणाचा सीआयडी तपास सुरु आहे. दोषींना अटक करण्यात आली असून कामचुकारपणा करणाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. कोठडीतील मृत्यूप्रकरणी हायकोर्टाचे जे आदेश आहेत, त्याचं सर्व जिल्ह्यांमध्ये काटेकोरपणे पालन होतं का, याची पुन्हा एकदा पडताळणी करण्यात येणार आहे, अशी माहिती केसरकर यांनी दिली.

कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरिक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी संबंधित वरिष्ठ अधिकारी म्हणून तातडीने पीडित कुटुंबीयांची भेट घेतली, अशी माहितीही केसरकर यांनी दिली.

संबंधित बातम्या :

अनिकेतच्या हत्येचा आरोपी पीएसआय कामटेचा मुजोरपणा कायम

गेल्या चार दिवसांत वेगवेगळ्या प्रकरणात 18 पोलिसांवर गुन्हे

मम्मी यांनीच पप्पांना मारलं का, कोथळेच्या लेकीचा सवाल

अनिकेत कोथळे मृत्यूप्रकरणी आणखी 7 पोलीस निलंबित

कसा आहे अनिकेत कोथळेच्या मृत्यूचा घटनाक्रम?

अश्लील चित्रिकरणाचा पर्दाफाश केल्याने अनिकेतची हत्या?

मालकाशी वादाचा अनिकेत कोथळेच्या हत्येशी संबंध?

सांगली पोलिसांच्या थर्ड डिग्रीमुळे तरुणाचा मृत्यू

Maharashtra News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:Aniket kothale case will be give to senior lawyer Ujjwal nikam
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

राहुल भड एवढेच अमरावती पोलीसही प्रतीक्षाच्या मृत्यूला जबाबदार
राहुल भड एवढेच अमरावती पोलीसही प्रतीक्षाच्या मृत्यूला जबाबदार

अमरावती : अमरावतीच्या वृंदावन कॉलनीतील ओंकार मंदिराजवळ प्रतीक्षा

औरंगाबाद जिल्ह्यात अवैध गर्भपात रॅकेटचा पर्दाफाश
औरंगाबाद जिल्ह्यात अवैध गर्भपात रॅकेटचा पर्दाफाश

औरंगाबाद : अवैध गर्भपात केंद्राचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.

नितीन आगेला न्याय मिळवून देण्यासाठी हायकोर्टात जाणार : आठवले
नितीन आगेला न्याय मिळवून देण्यासाठी हायकोर्टात जाणार : आठवले

नवी दिल्ली/अहमदनगर : पुरोगामी म्हणवणाऱ्या महाराष्ट्राला सुन्न

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 24/11/2017
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 24/11/2017

*एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 24/11/2017* 1. शिवसेना नेते आणि राज्यमंत्री

कलम 45 घटनाबाह्य, छगन भुजबळांना दिलासा मिळणार?
कलम 45 घटनाबाह्य, छगन भुजबळांना दिलासा मिळणार?

मुंबई : आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादीचे नेते

गरज पडल्यास सत्तेला लाथ मारेन : उद्धव ठाकरे
गरज पडल्यास सत्तेला लाथ मारेन : उद्धव ठाकरे

कोल्हापूर : शेतकऱ्यांची फसवणूक होऊ देणार नाही. गरज पडली तर सत्तेला

राज ठाकरे डीएसकेंच्या पाठीशी!
राज ठाकरे डीएसकेंच्या पाठीशी!

पुणे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे बांधकाम व्यावसायिक डी एस

मनसेचं एक पत्र, सरकारने राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचं नाव बदललं!
मनसेचं एक पत्र, सरकारने राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचं नाव बदललं!

अहमदनगर : मनसेच्या पत्र व्यवहारानंतर राज्यस्तरीय कबड्डी आणि

कोपर्डी निकाल : दोषी जितेंद्र शिंदेच्या वकिलांना धमकी
कोपर्डी निकाल : दोषी जितेंद्र शिंदेच्या वकिलांना धमकी

अहमदनगर : संपूर्ण राज्याला हादरवणाऱ्या कोपर्डी बलात्कार आणि हत्या

तांत्रिक मुद्द्यावरुन आमदारकी रद्द: अर्जुन खोतकर
तांत्रिक मुद्द्यावरुन आमदारकी रद्द: अर्जुन खोतकर

औरंगाबाद: मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने तांत्रिक