अनिकेत कोथळेचे मारेकरी पोलिस सेवेतून बडतर्फ

कोल्हापूर परिक्षेत्र विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, जिल्हा पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे यांनी ही कारवाई केली आहे.

अनिकेत कोथळेचे मारेकरी पोलिस सेवेतून बडतर्फ

सांगली : सांगली पोलिसांच्या थर्ड डिग्रीत अनिकेत कोथळेचा मृत्यू आणि प्रकरण दडपून टाकण्यासाठी त्याचा मृतदेह आंबोलीत नेऊन जाळल्याप्रकरणी, निलंबित पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटेसह आणखी पाच पोलिसांना सेवेतून बडतर्फ करण्यात आलं आहे.

कोल्हापूर परिक्षेत्र विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, जिल्हा पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे यांनी ही कारवाई केली आहे. या कारवाईचा अहवाल राज्याचे पोलिस महासंचालक यांनाही सादर करण्यात आला आहे.

कसा आहे अनिकेत कोथळेच्या मृत्यूचा घटनाक्रम?

पीएसआय युवराज कामटेसह हवालदार अनिल लाड, अरुण टोणे, राहुल शिंगटे, नसरुद्दीन मुल्ला अशी बडतर्फ केलेल्या पोलिसांची नावं आहेत. लाड, टोणे, शिंगटे आणि मुल्ला यांना बडतर्फ करण्याचे अधिकार जिल्हा पोलिस प्रमुखांना असल्याने नांगरे-पाटील यांनी पोलिसप्रमुख शिंदे यांना बडतर्फीची कारवाई करण्याचे आदेश दिले होते. तर पोलिस उपनिरीशक युवराज कामटेच्या बडतर्फीचे आदेश स्वतः काढले.

पोलिसांकडून झालेल्या या घटनेमुळे पोलिस दलाच्या कार्यपद्धतीविषयी सर्व समान्यांच्या मनात निर्माण झालेली शंका, पोलिस खात्याची झालेली बदनामी आणि पोलीस विभागात आलेले नैराश्य या बाबीचा विचार करुन ही बडतर्फीची कारवाई करत असल्याचं आदेशात म्हटलं आहे.

काय आहे प्रकरण?

सांगली पोलिसांनी 6 नोव्हेंबर रोजी थर्ड डिग्रीचा वापर करत अनिकेथ कोथळेला मारहाण केली. मारहाणीत अनिकेतचा मृत्यू झाल्यानंतर पोलिसांनी तरुणाचा मृतदेह जाळून त्याची परस्पर विल्हेवाटही लावली होती. त्यानंतर सिंधुदुर्गातील आंबोली महादेवगड पॉईंटवर पोलिसांनी अर्धवट अवस्थेत जाळून टाकलेला मृतदेह सापडला होता. या हत्येप्रकरणी आतापर्यंत पोलीस उपनिरीक्षकासह 12 पोलिसांचं निलंबन झालं आहे.

संबंधित बातम्या :

इलेक्ट्रिक शॉक देऊन मारहाण, कोल्हापूर पोलिसांची थर्ड डिग्री

सांगलीतील कोथळे कुटुंबियांचा आत्मदहनाचा इशारा

अनिकेतच्या हत्येचा आरोपी पीएसआय कामटेचा मुजोरपणा कायम

गेल्या चार दिवसांत वेगवेगळ्या प्रकरणात 18 पोलिसांवर गुन्हे

मम्मी यांनीच पप्पांना मारलं का, कोथळेच्या लेकीचा सवाल

अनिकेत कोथळे मृत्यूप्रकरणी आणखी 7 पोलीस निलंबित

अश्लील चित्रिकरणाचा पर्दाफाश केल्याने अनिकेतची हत्या?

मालकाशी वादाचा अनिकेत कोथळेच्या हत्येशी संबंध?

सांगली पोलिसांच्या थर्ड डिग्रीमुळे तरुणाचा मृत्यू

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Aniket Kothale Murder : 5 cops including PSI Yuvraj Kamte suspended for police force
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV