महाराष्ट्रातील चौघांना ‘जीवन रक्षा पदक पुरस्कार’ जाहीर

महाराष्ट्रातील राजेंद्र गुरव आणि भानुचंद्र पांडे यांना ‘उत्तम जीवन रक्षा पदक’ जाहीर झाले आहे. तर ‘जीवन रक्षा पदक’ पुरस्कार प्रणय तांबे आणि प्रभाकर साठे यांना जाहीर झाला आहे.

महाराष्ट्रातील चौघांना ‘जीवन रक्षा पदक पुरस्कार’ जाहीर

नवी दिल्ली : दैनंदिन जीवनात मानवाच्या संरक्षणासाठी उत्तम कामगिरी बजावणाऱ्या देशातील ४४ व्यक्तींना आज (बुधवार) ‘जीवन रक्षा पदक पुरस्कार’ जाहीर झाले आहेत. यात महाराष्ट्रातील दोघांचा समावेश आहे.

महाराष्ट्रातील राजेंद्र गुरव आणि भानुचंद्र पांडे यांना ‘उत्तम जीवन रक्षा पदक’ जाहीर झाले आहे. तर ‘जीवन रक्षा पदक’ पुरस्कार प्रणय तांबे आणि प्रभाकर साठे यांना जाहीर झाला आहे.

देशातील ४४ नागरिकांना तीन श्रेणीत हे पुरस्कार जाहीर झाले आहेत. यातील ७ जणांना हे पुरस्कार  मरणोत्तर जाहीर झाले आहेत. ‘सर्वोत्तम जीवन रक्षा पदक पुरस्कार’ ७ जणांना, ‘उत्तम जीवन रक्षा पदक पुरस्कार’ १३ जणांना आणि ‘जीवन रक्षा पदक पुरस्कार’ २४ जणांना जाहीर झाले आहेत.

पुरस्काराचे स्वरुप पदक, प्रमाणपत्र आणि डिमांड ड्राफ्ट स्वरुपात पुरस्कार राशी असे आहे. पुरस्कार जाहीर झाल्यानंतर काही कालावधीने देशातील संबंधित राज्य शासनाच्यावतीने हे पुरस्कार प्रदान करण्यात येतात.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Announcing ‘Jeevan Rakshak Padak Award’ for the four from Maharashtra latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV