कॅलिफोर्नियातील हिंदूविरोधी अभ्यासक्रम भारतीयांनी बदलला!

कॅलिफोर्निया राज्यातील इयत्ता पाचवी आणि सहावीचा अभ्यासक्रम हा भारत आणि हिंदू धर्माबाबत नकारात्मक प्रतिमा निर्माण करत होता.

कॅलिफोर्नियातील हिंदूविरोधी अभ्यासक्रम भारतीयांनी बदलला!

नागपूर : अमेरिकेतील भारतीयांना कॅलिफोर्नियामधील शालेय अभ्यासक्रमातला हिंदूविरोधी भाग बदलण्यात यश आलं आहे. गेली दहा वर्ष चाललेल्या या लढ्याला अखेर नोव्हेंबर महिन्यात यश मिळालं.

कॅलिफोर्निया राज्यातील इयत्ता पाचवी आणि सहावीचा अभ्यासक्रम हा भारत आणि हिंदू धर्माबाबत नकारात्मक प्रतिमा निर्माण करत होता. वेगवेगळ्या भागातून आलेल्या भारतीय हिंदूंनी याविरोधात चळवळ उभी केली आणि एक याचिका दाखल केली. हिंदू एज्युकेशन फाऊण्डेशन अंतर्गत गेली 10 वर्ष ही चळवळ सुरु होती.

नकारात्मक इमेज :

1. भारताच्या धड्यात भीक मागणाऱ्या मुलांचे चित्र
2. भारत म्हटलं की झोपडपट्ट्या
3. भारतीय माणूस आणि माकडे आजूबाजूला
4. देवी देवतांचेही नकारात्मक पद्धतीने चित्रण
5. हिंदू म्हणजे फक्त जातीव्यवस्था
6. भारताकडून जागतिक स्तरावरील कुठल्याही सकारात्मक योगदानाची दखल नाही

कॅलिफोर्निया हे अमेरिकेतील एक मोठं राज्य आहे. इथला सिलॅबस अमेरिकेतील इतर 12 ते 13 राज्यं जसाच्या तसा वापरतात. इतकंच नाही, तर काही युरोपियन देशातही हाच अभ्यासक्रम शिकवला जातो. त्याठिकाणी विद्यार्थ्यांमध्ये भारताची आणि हिंदू धर्माची नकारात्मक प्रतिमा निर्माण होण्याची शक्यता आहे. जवळपास 50 बाबी बदलण्याची तयारी कॅलिफोर्नियाने दर्शवली आहे.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Anti Hindu Syllabus in California school changed by Indians latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV