खुनी आणि वेडी माणसं सोडली तर भाजपात कुणालाही प्रवेश : बागडे

पक्षातील इनकमिंगवर आता खुद्द भाजपातील ज्येष्ठ नेत्यांनीच अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त केली आहे.

खुनी आणि वेडी माणसं सोडली तर भाजपात कुणालाही प्रवेश : बागडे

औरंगाबाद : भाजपातील वाढत्या गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या इनकमिंगवर खुद्द भाजपचे नेते आणि विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनीच टोलेबाजी केली आहे. भाजपात खुनाचा आरोपी आणि वेडी माणसं सोडली, तर सध्या कोणालाही सहज प्रवेश मिळतो, अस वक्तव्य हरिभाऊ बागडे यांनी केलं.

भाजपातील इनकमिंग म्हणजे काळानुसार झालेला बदल असल्याची टोलेबाजी हरिभाऊ बागडे यांनी केली. माजी पंतप्रधान अटलबिहारी बाजपेयी यांच्या 93 व्या वाढदिवसानिमित्त पक्षाच्या ज्येष्ठ आणि जुन्या ज्येष्ठ नेत्यांनी कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. त्या कार्यक्रमात हरिभाऊ बागडे बोलत होते.

हरिभाऊ बागडे हे औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री मतदारसंघाचे आमदार असून ते सध्या विधानसभा अध्यक्ष आहेत. त्यांनी 2014 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या कल्याण काळे यांचा पराभव केला होता. भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांपैकी ते एक आहेत. त्यामुळे पक्षातील इनकमिंगवर आता खुद्द भाजपातील ज्येष्ठ नेत्यांनीच अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त केली आहे.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: anyone can enter in bjp except murderers and mad
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV