कर्जमाफीच्या 2 लाख 41 हजार अर्जांची पुन्हा छाननी होणार!

कर्जमाफीसाठी राज्यभरातून जवळपास 56 लाख 59 हजार शेतकऱ्यांनी अर्ज भरले आहेत. पण त्यापैकी 2 लाख 41 हजार शेतकऱ्यांचे आधार क्रमांक नसल्यानं त्या सर्व अर्जांची पुन्हा छाननी होणार असल्याचंही समजतं आहे.

कर्जमाफीच्या 2 लाख  41 हजार अर्जांची पुन्हा छाननी होणार!

मुंबई : कर्जमाफीसाठी राज्यभरातून जवळपास 56 लाख 59 हजार शेतकऱ्यांनी अर्ज भरले आहेत. पण त्यापैकी 2 लाख 41 हजार शेतकऱ्यांचे आधार क्रमांक नसल्यानं त्या सर्व अर्जांची पुन्हा छाननी होणार असल्याचंही समजतं आहे.

कर्जमाफीसाठी मुंबई शहरातून 23 हजार 715 तर उपनगरांतून 1 हजार 620 शेतकऱ्यांनी कर्जमाफीचे अर्ज केले आहेत. तर अहमदनगर जिल्ह्यातून सर्वाधिक म्हणजे 3 लाख 34 हजार 920 शेतकऱ्यांनी कर्जमाफीचे अर्ज दिले आहेत.

दरम्यान, कर्जमाफीचे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी 22 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यापूर्वी ही मुदत 15 सप्टेंबरपर्यंत होती.

दुसरीकडे, कर्जमाफीचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्यांमध्ये 80 लाख पात्र, तर दहा लाख बनावट शेतकरी असल्याचा दावा, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. तसेच, येत्या ऑक्‍टोबरअखेरपर्यंत कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यावर जमा केली जाईल, असं आश्वासनही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिलं.

कर्जमाफीसाठी ऑनलाईन अर्ज करताना अजूनही काही शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत. मात्र ज्यांची बँक अकाऊंट बोगस आहेत, अशा शेतकऱ्यांनाच या अडचणी येत असल्याचंही पाटील यांनी नमूद केलं होतं.

संबंधित बातम्या

कर्जमाफी फॉर्म भरलेल्या यादीत तुमचं नाव आहे का? इथे चेक करा

कर्जमाफीचे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी 7 दिवसांची मुदतवाढ 

10 लाख शेतकरी बोगस, त्यांनाच कर्जमाफीचे फॉर्म भरताना अडचणी: चंद्रकांत पाटील


चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य चीड आणणारं: नाना पटोले

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV