कोपर्डी प्रकरण : दोषींच्या वकिलांचा कोर्टातील युक्तीवाद जसाच्या तसा

मुख्य दोषी आरोपी असलेल्या जितेंद्र शिंदेंने पीडित तरुणीला आपण मारलं नाही, असा दावा करत, फाशी ऐवजी जन्मठेप देण्याची मागणी केली. तर शिंदेचे वकील मोहन मकासरे यांनी आपल्या अशिलाला फाशी नको तर जन्मठेप द्यावी, अशी मागणी केली.

कोपर्डी प्रकरण : दोषींच्या वकिलांचा कोर्टातील युक्तीवाद जसाच्या तसा

अहमदनगर : राज्यासह देशाचं लक्ष लागलेल्या कोपर्डी बलात्कार आणि हत्याप्रकरणी तीन दोषींपैकी आरोपी क्रमांक 1 आणि क्रमांक 3 च्या वकिलांनी आज युक्तीवाद केला.

या प्रकरणातील मुख्य दोषी आरोपी असलेल्या जितेंद्र शिंदेंने पीडित तरुणीला आपण मारलं नाही, असा दावा करत, फाशी ऐवजी जन्मठेप देण्याची मागणी केली. तर शिंदेचे वकील योहान मकासरे यांनी आपल्या अशिलाला फाशी नको तर जन्मठेप द्यावी, अशी मागणी केली.

अॅड. प्रकाश आहेर (आरोपी क्रमांक 3 – नितीन भैलुमेचे वकील)
“आरोपी नंबर 3 म्हणजेच नितीन गोपीनाथ भैलुमेचा मी वकील असल्या कारणाने, मी आज  न्यायालयासमोर त्याच्यावतीने जी बाजू मांडली. विशेषत: त्याच्याविरोधात जी कलमं लावण्यात आलेली आहेत. ते '120-ब' म्हणजे कटकारस्थान आणि '109'  म्हणजे गुन्ह्याला उत्तेजित करणं, या दोन कलमांखाली आरोपी तीनला दोषी ठरवण्यात आले आहे.

जे काही कोर्टासमोर आलेले आहेत, त्यामध्ये आरोपी क्रमांक तीन याच्याविरोधात कुठलाही साक्षीदार नाही किंवा प्रत्यक्षदर्शी नाही. संपूर्ण खटला परिस्थितीजन्य पुराव्यावर आधारलेला आहे.

नितीन भैलुमे कॉलेजचा विद्यार्थी असून, बीएसस्सीच्या शेवटच्या वर्षाला शिक्षण घेतो आहे आणि त्याचे आई वडील गरीब आहेत. दलित कुटुंबातून येऊन इतकं शिक्षण घेतलं. नितीनच्या पुढील अभ्यासासाठी न्यायालयाने जेलमध्ये पुस्तकेही पुरवली होती. त्याची आई आजारी असते. तिचं ऑपरेशन झालेलं आहे. वडील मजुरी करतात. या गुन्ह्यात अडकवल्यामुळे आणि त्याला 120 ब आणि 109 मध्ये दोषी असून,  302 म्हणजे गुन्ह्यामध्ये कुठलाही संबंध नाही, बलात्कारामध्ये त्याचा कुठलाही संबंध नाही. त्याच्याविरोधात कुठलाही मेडिकल पुरावा नाही. दाताच्या सॅम्पलमध्येही त्याच्याविरोधात रिपोर्ट आलेले नाहीत.”

अॅड. योहान मकासरे (आरोपी क्रमांक 1 – जितेंद्र शिंदेचे वकील)
“मी सरकारकडूनही आरोपी नंबर एकचं काम पाहतोय, आणि फाशी न देता जन्मठेप द्यावी, अशी विनंती केली आहे. आरोपी म्हणत होता, मी मारलं नाही. पण आज सुनावणी यासंदर्भात नव्हतीच. फाशी की जन्मठेप, हे सांगायचं होतं. आम्ही जन्मठेपेची मागणी केली आहे.”

संबंधित बातमी : कोपर्डी निकाल : मला फाशी नको, जन्मठेप द्या: जितेंद्र शिंदे

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Argument of convicts in kopardi case latest updates
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV