अंजली दमानियांविरोधात अटक वॉरंट जारी

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या अडचणी वाढ होण्याची शक्यता आहे.

अंजली दमानियांविरोधात अटक वॉरंट जारी

जळगाव : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या अडचणी वाढ होण्याची शक्यता आहे. कारण, भाजप नेते एकनाथ खडसेंची बदनामी केल्याप्रकरणी अंजली दमानिया यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलं आहे.

या खटल्याच्या सुनावणीदरम्यान अंजली दमानिया सतत गैरहजर राहत असल्यानं रावेर न्यायालयानं त्यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केल्याची माहिती मिळते आहे.

दरम्यान एकनाथ खडसे आणि भाजपची नाहक बदनामी केल्याप्रकरणी रावेरचे तालुका अध्यक्ष सुनील पाटील यांनी अंजली दमानियांविरोधात याचिका दाखल केली होती.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Arrest warrant issued against Anjali Damaniya latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV