ATM च्या उघड्या कॅशबॉक्समध्ये सुमारे 20 लाखांची रोकड आणि...

रहिवाशाच्या सतर्कतेमुळे येथील मोठी चोरी टळली आहे. या कॅशबॉक्समध्ये सुमारे 20 लाखांची रोकड होती.

ATM च्या उघड्या कॅशबॉक्समध्ये सुमारे 20 लाखांची रोकड आणि...

रायगड : उरणमध्ये एटीएम मशिनमधील ‘कॅशबॉक्स’ उघडा राहिले होते. रहिवाशाच्या सतर्कतेमुळे येथील मोठी चोरी टळली आहे. या कॅशबॉक्समध्ये सुमारे 20 लाखांची रोकड होती.

उरण शहरातील बाजारपेठेत मुख्य रस्त्यालगत सेंट्रल बँक ऑफ इंडियाचं एटीएम आहे. सोमवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास एक स्थानिक रहिवाशी या एटीएममध्ये गेला. त्यावेळी एटीएमचं कॅशबॉक्स उघडा असल्याचे लक्षात आले.

स्थानिक रहिवाशाने सतर्कता दाखवत सदर घटनेची माहिती स्थानिक पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने एटीएम गाठले. त्यानंतर पोलिसांनी एटीएम मशिनमध्ये रोकड टाकणाऱ्या एजन्सीला संपर्क केला.

दरम्यान, स्थानिक रहिवाशाच्या सतर्कतेमुळे एटीएममधील ही रक्कम चोरी होण्यापासून रोखण्यात मदत झाली आहे. तर एटीएममधील कॅशबॉक्स उघडा कसे राहिले? हा प्रश्न मात्र अनुत्तरीत असून या हलगर्जीपणाला जबाबदार कोण आणि या मागचे नेमकं कारण शोधणे गरजेचे आहे.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
अधिक माहिती: ATM Cashbox एटीएम कॅशबॉक्स
First Published:
LiveTV