घोड्यावरुन अधिकाऱ्यांचा बोंडअळीचा पंचनामा

औरंगाबाद जिल्ह्यातल्या वैजापूर भागात हा प्रकार समोर आलाय.

घोड्यावरुन अधिकाऱ्यांचा बोंडअळीचा पंचनामा

औरंगाबाद: हिवाळी अधिवेशनात बोंडअळीचा मुद्दा बराच गाजल्यानं सरकारनं तातडीनं बाधित पिकांचे पंचनामे सुरु केले आहेत. मात्र त्यासाठी फक्त 10 दिवसांची डेडलाईन दिली गेल्यानं, चक्क घोड्यावरुन बसून कृषी अधिकारी पंचनामे करत आहेत.

औरंगाबाद जिल्ह्यातल्या वैजापूर भागात हा प्रकार समोर आलाय.

हजारो हेक्टरवरील कपाशीचे पंचनामे करायचे असल्याने, घोड्यावर बसून पंचनामे करण्याशिवाय पर्याय नाही,असं अधिकाऱ्यांचं म्हणणं  आहे.

राज्यात सर्वत्र कापसावर बोंड अळीचा प्रादुर्भाव झालाय. बोंडअळीमुळं शेतकऱ्यांचं मोठ नुकसान झालंय. या नुकसानीचा पंचनामा करण्याचे आदेश सरकारकडून देण्यात आलेत. मात्र, अधिकाऱ्यांनीही डेडलाईन पाळण्यासाठी चक्क घोड्यावर पंचनामा सुरु केल्यानं, सर्वत्र यांची चर्चा चांगलीच रंगतेय.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Aurangabad : Agriculture officers came on horse for crop survey
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV