औरंगाबादमधील शाळेत बाहेरच्या मुलांकडून लाठ्या-साखळीने मारहाण

मारल्याचा राग मनात धरुन विद्यार्थ्याचा भाऊ आणि सात जण हातात लाठ्या-काढ्या आणि साखळ्या घेऊन फिल्मी स्टाईलने शाळेत घुसले. त्यानंतर ते मुलांना मारहाण करु लागले.

औरंगाबादमधील शाळेत बाहेरच्या मुलांकडून लाठ्या-साखळीने मारहाण

औरंगाबाद : नववीत शिकणाऱ्या दोन विद्यार्थ्यांमध्ये शाळेत झालेल्या मारहाणीच्या वादात, बाहेरच्या तरुणांनी हस्तक्षेप केला आणि थेट शाळेत घुसून जबर मारहाण केली. औरंगाबादच्या उस्मानपुरा इथल्या गुरुतेगबहादूर शाळेमध्ये हा प्रकार घडला आहे. शाळेतील मारहाणीचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे.

नववीतल्या दोन मुलांचं वर्गात भांडण झालं. त्यापैकी एका मुलाने ही बाब मोठ्या भावाला सांगितली. मारल्याचा राग मनात धरुन विद्यार्थ्याचा भाऊ आणि सात जण हातात लाठ्या-काढ्या आणि साखळ्या घेऊन फिल्मी स्टाईलने शाळेत घुसले. त्यानंतर ते मुलांना मारहाण करु लागले.

शिक्षकांना हा प्रकार समजताच त्यांनी शाळेचं मुख्य गेट लावून घेतल्याने हे गुंड आतच अडकले. त्यामुळे या मुलांची ओळख पटू शकली. उस्मानपुरा पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे.

मुख्याध्यापकांनी या प्रकरणाची पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलिसांनी रात्री उशिरा गुडंगिरी करणाऱ्या आठ तरुणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पाहा व्हिडीओ

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Aurangabad : Filmy style fighting in school
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV