18व्या दिवशीही औरंगाबादमधील कचराकोंडी कायम

औरंगाबाद शहरात कचराकोंडीचा आजचा 18 वा दिवस आहे. मात्र अजूनही हा प्रश्न निकाली निघालेला नाही. दरम्यान, कचरा प्रश्नावर काहीही करुन तोडगा काढा असे आदेश उच्च न्यायालयानं पालिकेला दिले आहेत.

18व्या दिवशीही औरंगाबादमधील कचराकोंडी कायम

औरंगाबाद : औरंगाबाद शहरात कचराकोंडीचा आजचा 18 वा दिवस आहे. मात्र अजूनही हा प्रश्न निकाली निघालेला नाही. दरम्यान, कचरा प्रश्नावर काहीही करुन तोडगा काढा असे आदेश उच्च न्यायालयानं पालिकेला दिले आहेत. तर कचरा टाकायला विरोध करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जातील असं विभागीय आयुक्तांनी म्हटलं आहे.

दुसरीकडे, प्रशासनानं आपल्या गावात कचरा टाकू नये यासाठी रात्रभर गोलवाडी, तिसगाव इथल्या भागातल्या ग्रामस्थांनी कडा पाहारा दिला. तर काल सकाळी प्रशासनाचं एक पथक गावामध्ये प्रश्न सोडवण्यासाठी आलं आणि गावकऱ्यांनी अधिकाऱ्यांना घेराव घातला.

यावेळी अधिकाऱ्यांसोबतच्या एका पोलिसानं गावकऱ्यांवर बंदूकही रोखली, मात्र अधिकाऱ्यांनी सामंजस्याची भूमिका घेतल्यानंतर हा वाद निवळला.

नारेगावच्या डेपोत आधी औरंगाबाद शहराचा कचरा टाकला जायचा, मात्र त्यांनी आता कचरा टाकू देण्यास विरोध केल्यानं औरंगाबाद महापालिकेला अजून दुसरी पर्यायी जागा शोधण्यात यश आलेलं नाही.

काल तिसगाव गोलवाडी या गावातील ग्रामस्थांनी आमदार अतुल सावे यांची गाडी अडवली. आणि आमच्या भागात कचरा टाकू देणार नाही असा पवित्रा घेतला.

संबंधित बातम्या :

औरंगाबादेतील कचराकोंडीचा 17 वा दिवस, आमदार सावेंची गाडी अडवली

औरंगाबादचा कचरा, गावकऱ्यांनी कचऱ्याची गाडी फोडली

कचराप्रश्न पेटलेल्या औरंगाबादेतील दोन चकचकीत वॉर्ड

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: aurangabad garbage issue on 18th day latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV