औरंगाबादच्या गोळेगावातही 'तुफान आलंया', वॉटर कपसाठी श्रमदान सुरु

Aurangabad : Gole village to participate in Toofan Aalaya water cup

औरंगाबाद : औरंगाबादमधील खुलताबाद तालुक्यातल्या गोळेगावात पाणी फाऊंडेशनच्या कामाला सुरुवात झाली आहे. गोळेगावाची यंदाच्या वॉटर कप स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.

सकाळी 6 वाजल्यापासूनच गावकऱ्यांनी श्रमदान सुरु केलं. गावात छोटे बंधारे आणि चरांच्या माध्यमातून जलसंधारणाची कामं करुन पाणी अडवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

भविष्यात दुष्काळामुळे शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ येऊ नये, म्हणून वॉटर कप स्पर्धेच्या माध्यमातून जलसंधारणाची कामं केली जात आहेत. त्याचाच भाग म्हणून आता गोळेगाव ग्रामस्थांनी देखील स्पर्धा जिंकण्यासाठी कंबर कसली आहे.

सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वात म्हणजे ‘तुफान आलंया….!’ मध्ये विदर्भ योद्धा, मराठवाडा वीर आणि पश्चिम महाराष्ट्राचे मावळे अशा तीन संघाचा समावेश असेल. या पर्वात महाराष्ट्राच्या 30 तालुक्यांमधून तब्बल 2024 गावं सहभागी होणार आहेत.

‘वॉटर कप’चं पुन्हा ‘तुफान आलंया…!’

8 एप्रिल 2017 ते 22 मे 2017 दरम्यान ही स्पर्धा रंगेल. एबीपी माझावर दर शनिवारी रात्री 9 वाजता हा कार्यक्रम पाहता येणार आहे.

वॉटर कप स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वात सहभागी 30 तालुके

पुणे – पुरंदर, इंदापूर
वाशिम – कारंजा
सातारा – कोरेगाव, माण, खटाव
औरंगाबाद – फुलंब्री, खुलताबाद
उस्मानाबाद – भूम, परंडा, कळंब
लातूर – औसा, निलंगा
वर्धा – आर्वी
यवतमाळ – राळेगाव, कळंब, उमरखेड
अकोला – अकोट, पातुर, बार्शी-टाकळी
सांगली – खानापूर, आटपाडी, जत
सोलापूर – सांगोला, उत्तर सोलापूर
बीड – अंबेजोगाई, केज, धारुर
अमरावती – वरुड, धारणी

सत्यमेव जयते वॉटर कपच्या पहिल्या पर्वात 116 गावं सहभागी झाली होती. पानी फाऊंडेशनने महाराष्ट्रातल्या तीन तालुक्यात ही स्पर्धा घेतली होती.

पहिल्या वॉटर कप स्पर्धेचा निकाल

पहिला क्रमांक  : साताऱ्याच्या कोरेगाव तालुक्यातल्या वेळू गाव ( 50 लाख रुपये)

दुसरा क्रमांक : साताऱ्याच्या जायगाव आणि बीडच्या खापरटोन गावांना विभागून (30 लाख रुपये)

तिसरा क्रमांक : बीडच्या राडीतांडा आणि अमरावतीच्या वाठोडा गावांना विभागून (20 लाख रुपये)

First Published:

Related Stories

शेतकरी कर्जमाफीचे निकष, जीआर जारी
शेतकरी कर्जमाफीचे निकष, जीआर जारी

मुंबई : राज्यातील सुमारे 89 लाख शेतकऱ्यांना 34 हजार 22 कोटी रुपयांची

11वी ऑनलाईन प्रवेश अर्जाचा आजचा शेवटचा दिवस
11वी ऑनलाईन प्रवेश अर्जाचा आजचा शेवटचा दिवस

मुंबई: मुंबईतील ११वीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन प्रवेश अर्ज

मुंबईत पावसाची विश्रांती, रायगडात अतिवृष्टीचा इशारा
मुंबईत पावसाची विश्रांती, रायगडात अतिवृष्टीचा इशारा

मुंबई : मुंबईला बुधवारी दिवसभर पावसानं झोडपल्यानंतर गुरुवारी

सदाभाऊंनी 4 जुलैपर्यंत बाजू मांडावी, राजू शेट्टींचा अल्टिमेटम
सदाभाऊंनी 4 जुलैपर्यंत बाजू मांडावी, राजू शेट्टींचा अल्टिमेटम

पुणे : सदाभाऊ खोत यांच्याबाबत कार्यकारिणीच्या बैठकीत अनेक

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 28/06/2017
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 28/06/2017

युरोपमध्ये पुन्हा सायबर हल्ला, बँका, कंपन्यांसह ब्रिटीश

चार कोटींच्या विम्यासाठी स्वत:च्याच मृत्यूचा बनाव
चार कोटींच्या विम्यासाठी स्वत:च्याच मृत्यूचा बनाव

नाशिक : नाशिकमध्ये अपघाती मृत्यूनंतर मिळणाऱ्या विम्याच्या चार

साताऱ्यातील मेढा गावात भिंत घरावर कोसळल्यानं 10 जण जखमी
साताऱ्यातील मेढा गावात भिंत घरावर कोसळल्यानं 10 जण जखमी

सातारा : जावळी तालुक्यातील मेढा गावातील एका खासगी व्यक्तीच्या

राष्ट्रीयत्व सिद्ध करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या सेतू सुविधा केंद्रावर फेऱ्या
राष्ट्रीयत्व सिद्ध करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या सेतू सुविधा...

उस्मानाबाद : विद्यार्थ्यांकडे असलेल्या आधारकार्डावर खरंतर

शाळेच्या पटांगणात झाड कोसळलं, 20 विद्यार्थी जखमी
शाळेच्या पटांगणात झाड कोसळलं, 20 विद्यार्थी जखमी

रायगड:  शाळेच्या पटांगणात झाड कोसळल्यामुळे 20 विद्यार्थी जखमी झाले

अकोला मनपात राडा, नगरसेवकाने सभागृहात डुक्कर आणलं
अकोला मनपात राडा, नगरसेवकाने सभागृहात डुक्कर आणलं

अकोला: खडाजंगीसाठी प्रसिद्ध असलेल्या अकोला महापालिकेत आज पुन्हा