औरंगाबाद पालिकेने 12 कोटी थकवले, महावितरणकडून वीज खंडित

गेल्या काही महिन्यांपासून औरंगाबाद महापालिकेनं 12 कोटी 82 लाख रुपयांचं वीज बिल थकवलं होतं.

औरंगाबाद पालिकेने 12 कोटी थकवले, महावितरणकडून वीज खंडित

औरंगाबाद : औरंगाबादमध्ये महावितरणनं वीज कनेक्शन तोडल्यानंतर औरंगाबाद महापालिकेला जाग आली आहे. थकित 12 कोटींपैकी दोन कोटी रुपये भरल्यामुळे तूर्तास पाणीकपातीचं संकट टळलं आहे.

गेल्या काही महिन्यांपासून औरंगाबाद महापालिकेनं 12 कोटी 82 लाख रुपयांचं वीज बिल थकवलं होतं. यासंदर्भात महावितरण कंपनीनं पालिकेला दोन नोटीस बजावल्या. मात्र तरीही पालिकेनं वीज देयकाचा भरणा केला नाही.

अखेर औरंगाबाद महापालिकेच्या  पाणीपुरवठा योजनेचा विद्युत पुरवठा महावितरणकडून तोडण्यात आला. त्यामुळे औरंगाबादकरांवर 'पाणीबाणी' निर्माण झाली. त्यानंतर पालिकेनं 12 कोटींपैकी दोन कोटींचं बिल भरलं.

तूर्तास औरंगाबादवासियांवरील पाणीकपातीचं संकट टळलं आहे. मात्र आज सहा तास उशिरा पाणी पुरवठा होणार आहे.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Aurangabad : Mahavitaran cuts electricity as Municipality failed to pay bill latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV