घरातला कचरा साफ, पैसेही मिळणार, औरंगाबादेत टकाटक भंगारवाला

घरातला कचरा साफ, पैसेही मिळणार, औरंगाबादेत टकाटक भंगारवाला

औरंगाबाद : घरातील कचराही साफ होणार आणि त्याचे पैसेही मिळणार... असं झालं तर? औरंगाबादमध्ये प्रदूषण टाळण्यासाठी आणि नागरिकांच्याही सोयीसाठी एक टकाटक भंगारवाला फिरत आहे.

'हॅलो... टकाटक भंगारवाला बोलतोय' यापुढे औरंगाबादमध्ये तुम्हाला असा फोन आला, तर नवल वाटायला नको... घरात कचरा साठून असेल, तर त्याचीही चिंता नको. कारण यापुढे तुमच्या घरातला कचरा उचलण्यासाठी टकाटक भंगारवाला तुमच्या घरात हजर होणार आहे.

घराघरातला सुका कचरा रस्त्यावर पडू नये, यासाठी औरंगाबाद महानगरपालिका आणि बजाज यांच्या 'माझी सिटी' या मोहिमेअंतर्गत हा उपक्रम राबवण्यात येत आहे.

फोन केल्यावर टकाटक भंगारवाला तुमच्या दारापर्यंत येतो. घरातील टाकाऊ माल, सुका कचरा सगळं काही हा भंगारवाला घेऊन जातो. कुणी हा माल दान करतो, तर कुणी मालाच्या बदल्यात पैसे घेतात.

अनेक शहरात कचऱ्याच्या समस्या वाढत चालल्या आहेत. रस्त्याच्या कोपऱ्या-कोपऱ्यावर कचऱ्याचे ढीग पडून असतात. अनेकदा फुरसुंगीसारखे कचऱ्याचे प्रश्नही तापतात. मात्र ह्या टकाटक भंगारवाल्यामुळे घरं तर स्वच्छ आणि सुंदर राहतीलच, पण शहरही अगदी टकाटक होतील.

पाहा व्हिडिओ :

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Aurangabad : Scrapers to clean your house and give money in return latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV