औरंगाबादेत कॉलेजच्या हलगर्जीने 100 विद्यार्थ्यांची परीक्षा मुकली

फर्दापूरच्या नॅशनल कॉलेजला विद्यापीठाच्या वतीनं नोटीस पाठवण्यात येणार असल्याचं परीक्षा नियंत्रक दिगंबर नेटके यांनी सांगितलं.

औरंगाबादेत कॉलेजच्या हलगर्जीने 100 विद्यार्थ्यांची परीक्षा मुकली

औरंगाबाद : औरंगाबादेतील फर्दापूरच्या नॅशनल कॉलेजला विद्यापीठाच्या वतीनं नोटीस पाठवण्यात येणार आहे. कॉलेजनं विद्यार्थ्यांकडून परीक्षा फी घेऊनही विद्यापीठाकडे जमा न केल्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेला मुकावं लागलं होतं.

परीक्षेपासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांच्या तात्काळ परीक्षा घेणार आहेत. फर्दापूरच्या नॅशनल कॉलेजला विद्यापीठाच्या वतीनं नोटीस पाठवण्यात येणार असल्याचं परीक्षा नियंत्रक दिगंबर नेटके यांनी सांगितलं.

कॉलेजनं विद्यार्थ्यांकडून परीक्षा फी घेऊनही विद्यापीठाकडे जमा न केल्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेला मुकावं लागलं होतं. घडलेल्या प्रकाराबद्दल विद्यापीठानं पुढाकार घेत विद्यार्थ्यांची दिलगिरी व्यक्त केली आहे.

महाविद्यालयाच्या भोंगळ कारभारामुळे तब्बल 100 विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान झालं आहे. तर अनेक विद्यार्थ्यांना परीक्षेचे सेंटरही मिळत नाहीत, काही विद्यार्थ्यांना तर खाली बसून परीक्षा द्यावी लागत आहे.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Aurangabad : Students missed exams as college failed to submit exam fees with university latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV