शेतकऱ्यांना तातडीने 10 हजार रुपये कर्ज मिळणार, शासन निर्णय जारी

Banks to provide 10 thousand rupees crop loan to farmers until loan waiver latest updates

प्रातिनिधिक फोटो

मुंबई : खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना तातडीने 10 हजार रुपयांचे कर्ज देण्‍याची घोषणा राज्य सरकारने केली होती. मात्र तसा शासकीय आदेश बँकांना न दिल्यामुळे या निर्णयाबाबतही शेतकऱ्यांमध्ये संभ्रम होता. अखेर  यासंबंधीचा जीआर आता शासनाने जारी केला आहे.

पीककर्जासाठी कोणती बँक टाळाटाळ करत असेल किंवा कोणत्याही प्रकारची अडचण येत असल्यास, शेतकऱ्यांनी 9923333344 या क्रमांकावर संपर्क करावा, असं आवाहन सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी केलं आहे. कर्ज देताना शेतकऱ्यांकडून शपथपत्र घेतलं जाणार आहे.

काय आहे शासन निर्णय?

  • सर्व जिल्हा बँका आणि व्यापारी बँकांनी 30 जून 2016 रोजी थकबाकीदार असलेल्या सर्व शेतकऱ्यांना खरीपासाठी 10 हजार रुपयांचे तातडीचं कर्ज उपलब्ध करुन द्यावं. या कर्जाची हमी राज्य सरकार घेईल.
  • शासन हमीच्या आधारावर संबंधित बँकांनी अशा शेतकऱ्यांचं स्वतंत्र खातं उघडावं आणि शेतकऱ्यांना 10 हजार रुपयांपर्यंत वाटप केलेलं पीककर्ज संबंधित बँकांनी ‘सरकारकडून कर्जमाफी 2017 पोटी रक्कम येणे बाकी’, असं दर्शवावं.
  • नोकरदार, आमदार, खासदार, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, निवृत्तीवेतनधारक व्यक्ती, करदाते, डॉक्टर, वकील, कृषी उत्पन्न बाजार समिती, सहकारी साखर कारखाना, सहकारी सुतगिरणी, नागरी सहकारी  बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, सहकारी दूध संघ यांचे संचालक आणि या संस्थांचे अधिकारी, कामगार यांना हे कर्ज मिळणार नाही.

यांना कर्ज मिळणार नाही

तातडीच्या मदतीचा लाभ केवळ गरजू शेतकऱ्यांना व्हावा, यासाठी राज्य सरकारने काही निकष ठरवले आहेत. एखाद्या शेतकऱ्याच्या घरात कमाईचा इतर स्रोत असल्यास या कर्जाचा लाभ घेता येणार नाही. नोकरदार, आमदार, खासदार, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, निवृत्तीवेतनधारक व्यक्ती, करदाते, डॉक्टर, वकील, कृषी उत्पन्न बाजार समिती, सहकारी साखर कारखाना, सहकारी सुतगिरणी, नागरी सहकारी  बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, सहकारी दूध संघ यांचे संचालक आणि या संस्थांचे अधिकारी, कामगार यांना हे कर्ज मिळणार नाही.

याशिवाय केंद्र आणि राज्य शासकीय, निमशासकीय अधिकारी, कर्मचारी, शासन अनुदानित सर्व महाविद्यालय आणि शाळांचे शिक्षक, प्राध्यापक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी, राज्य शासन अर्थसहाय्यित संस्थांचे अधिकारी आणि कर्मचारी यांनाही या तातडीच्या कर्जाचा लाभ घेता येणार नाही.

राज्य सरकारने कर्जमाफी जाहीर केली आहे. मात्र कर्जमाफीचे निकष ठरवण्यासाठी समिती नियुक्त करण्यात येणार आहे. तोपर्यंत शेतकऱ्यांना तातडीचा दिलासा देण्यासाठी ही 10 हजार रुपयांची मदत देण्यात येणार आहे.

कॅबिनेट बैठकीत परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी शेतकऱ्यांना 10 हजार रुपये तातडीची मदत द्यावी, अशी मागणी केली होती. याला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. मात्र बँकांशी बोलून या निर्णयाबाबत शासन निर्णय काढण्यात आला.

Agriculture News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:Banks to provide 10 thousand rupees crop loan to farmers until loan waiver latest updates
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

शेतकऱ्यांना दिलासा, उडीद आणि मुगाच्या आयातीवर निर्बंध!
शेतकऱ्यांना दिलासा, उडीद आणि मुगाच्या आयातीवर निर्बंध!

नवी दिल्ली : केंद्र सरकारने उडीद आणि मुगाच्या आयातीवर निर्बंध

भंगारातून नॅनो ट्रॅक्टर, अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी राजेंद्र लोहारांचा उत्तम पर्याय
भंगारातून नॅनो ट्रॅक्टर, अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी राजेंद्र...

जळगाव : अल्पभूधारक शेतकऱ्यांची स्थिती इतर शेतकऱ्यांच्या तुलनेत

शेतकऱ्यांना 'बीज से बाजार' तक सुविधा देणार: मोदी
शेतकऱ्यांना 'बीज से बाजार' तक सुविधा देणार: मोदी

नवी दिल्ली: मातीतून सोनं पिकवण्याची धमक माझ्या शेतकऱ्यांमध्ये आहे,

क्षारपड जमिनीत अरुण आलासेंचा कोळंबी उत्पादनाचा यशस्वी प्रयोग
क्षारपड जमिनीत अरुण आलासेंचा कोळंबी उत्पादनाचा यशस्वी प्रयोग

कोल्हापूर : मासे खाणाऱ्यांसाठी कोळंबी म्हणजे जीव कि प्राण. या

पीकविमा आज संध्याकाळी 5 पर्यंत भरता येणार, शेतकऱ्यांना दिलासा
पीकविमा आज संध्याकाळी 5 पर्यंत भरता येणार, शेतकऱ्यांना दिलासा

मुंबई : शेतकऱ्यांना पीकविमा अर्ज भरता यावा यासाठी सरकारने आणखी एक

पीकविम्याची आज शेवटची तारीख, सर्व्हर मात्र डाऊन!
पीकविम्याची आज शेवटची तारीख, सर्व्हर मात्र डाऊन!

बीड : पीक विमा भरण्याची आज 4 ऑगस्ट ही शेवटची मुदत आहे, मात्र

बिगर कर्जदार शेतकऱ्यांना 4 ऑगस्टपर्यंत पीक विमा भरता येणार
बिगर कर्जदार शेतकऱ्यांना 4 ऑगस्टपर्यंत पीक विमा भरता येणार

मुंबई : प्रधानमंत्री पीक विमा योजनेसंदर्भात राज्य सरकारकडून आणखी

पीकविमा भरणाऱ्या शेतकऱ्यांची तलाठ्यांकडून आर्थिक पिळवणूक
पीकविमा भरणाऱ्या शेतकऱ्यांची तलाठ्यांकडून आर्थिक पिळवणूक

अहमदनगर : पीकविमा भरण्यासाठी रांगेत ताटकळणाऱ्या शेतकऱ्यांची

पीकविम्याचे अर्ज स्वीकारण्याची मुदत 5 ऑगस्टपर्यंत वाढवली
पीकविम्याचे अर्ज स्वीकारण्याची मुदत 5 ऑगस्टपर्यंत वाढवली

मुंबई : प्रधानमंत्री पीक विमा योजनेचे अर्ज स्वीकारण्यासाठी 5

पीकविम्याची मुदत वाढवली नाही तर दिल्ली गाठू, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन
पीकविम्याची मुदत वाढवली नाही तर दिल्ली गाठू, मुख्यमंत्र्यांचं...

मुंबई : पीकविमा भरण्याची मुदत संपत आली तरीही अद्याप लाखो शेतकरी