शिवसेना शहरप्रमुखाच्या कारखाली चिरडून दोन विद्यार्थिनींचा मृत्यू

अंजनगावमधल्या सोमेश्वर विद्यालयात परीक्षेसाठी जात असताना गाडीनं त्यांना चिरडलं.

शिवसेना शहरप्रमुखाच्या कारखाली चिरडून दोन विद्यार्थिनींचा मृत्यू

बारामती : बारामती शिवसेना शहरप्रमुख पप्पू माने याच्या कारनं तीन शाळकरी मुलींना चिरडलं आहे. या अपघातात दोघींचा मृत्यू झाला असून एकीची परिस्थिती गंभीर असल्याची माहिती आहे.

बारामती-मोरगाव रोडवर  कऱ्हावाघज भागात हा अपघात घडल्याची माहिती आहे. समीक्षा वीटकर आणि दिव्या पवार अशी अपघातात मृत्युमुखी पडल्या, तर पायल लष्कर गंभीर जखमी झाली आहे.

तिघीही अंजनगावमधल्या सोमेश्वर विद्यालयात परीक्षेसाठी जात असताना गाडीनं त्यांना चिरडलं. या अपघातानंतर शिवसेना शहरप्रमुख पप्पू माने फरार झाला असून, संतप्त रहिवाशांनी त्याची गाडी पेटवून दिली आहे.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV