सोलापुरात गटविकास अधिकाऱ्याला अज्ञातांची बेदम मारहाण

सोलापूर जिल्ह्यातील परंडा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व्ही. जी नलावडे यांना बार्शीमध्ये मारहाण करण्यात आली आहे.

सोलापुरात गटविकास अधिकाऱ्याला अज्ञातांची बेदम मारहाण

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील परंडा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व्ही. जी नलावडे यांना बार्शीमध्ये मारहाण करण्यात आली आहे. अज्ञात लोकांनी ही मारहाण केल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान मारहाणीत नलावडे जखमी झाले असून त्यांच्यावर बार्शीतील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

गटविकास अधिकारी नलावडे हे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याची भेट घेण्यासाठी बार्शीला आले होते. यावेळी तिथे असणाऱ्या तीन ते चारजणांनी नलावडे यांना घेरलं आणि मारहाण करण्यास सुरुवात केली.

जेव्हा भाऊसाहेब दगडे हे शेतकरी आपलं काम घेऊन आले, तेव्हा त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं आणि आता त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्यावर भेटायला आला आहात, असा जाब विचारत ही मारहाण झाल्याची माहिती मिळते आहे.

नलावडे यांना सध्या बार्शीतील जगदाळे मामा रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: bdo beaten by unknown people in solapur latest marathi news updates
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV