लिंग बदलानंतर पुन्हा पोलिसात रुजू होण्यास 'तिला' परवानगी नाही

लिंगबदल करुन सेवेत रुजू करुन घेण्यासाठी कोणताच नियम नसल्याचं पत्रात म्हटल्याची माहिती आहे.

लिंग बदलानंतर पुन्हा पोलिसात रुजू होण्यास 'तिला' परवानगी नाही

बीड : बीडमध्ये लिंग बदल शस्त्रक्रियेनंतर पुन्हा पोलिस सेवेत रुजू करण्याची महिलेची मागणी नाकारण्यात आली आहे. राज्याचे पोलिस महासंचालक सतिष माथूर यांनी ही परवानगी नाकारली आहे.

यासंदर्भात बीड पोलिस अधीक्षकांना पत्र प्राप्त झालं आहे. त्यामुळे संबंधित महिला पोलिस हायकोर्टात जाण्याच्या तयारीत आहे.

माजलगाव पोलिस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या एका महिलेनं महिन्याभरापूर्वी जिल्हा पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्याकडे लिंगबदल शस्त्रक्रिया करण्यासाठी एक महिन्याची रजा आणि त्यानंतर पोलिस दलात पुन्हा पुरुष पोलिस म्हणून रुजू करुन घेण्याची मागणी केली होती.

बीडमधील महिला पोलिस कॉन्स्टेबलची लिंग बदलासाठी सुट्टी


हा विषय अधीक्षकांच्या अखत्यारित नसल्यामुळे त्यांनी तिचा अर्ज पोलिस महासंचालक सतिष माथूर यांच्याकडे पाठवला. मात्र आता महासंचालकांनी ही परवानगी नाकारली आहे. लिंगबदल करुन सेवेत रुजू करुन घेण्यासाठी कोणताच नियम नसल्याचं पत्रात म्हटल्याची माहिती आहे.

23 जून रोजी मुंबईतल्या जेजे रुग्णालयात या महिला कॉन्स्टेबलची हार्मोन आणि शारीरिक चाचणी झाली. डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर 17 सप्टेंबर रोजी तिनं लिंग बदलण्यासाठी सुट्टीचा अर्ज केला होता.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Beed Lady Constable denied permission to join police department post sex change operation latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV