बीडमधील महिला पोलिस कॉन्स्टेबलची लिंग बदलासाठी सुट्टी

बीडच्या महिला पोलिस कॉन्स्टेबलनं ज्या कारणासाठी सुट्टी मागितली आहे, ते कारण ऐकून राज्याच्या गृह विभागात एकच खळबळ उडाली आहे.

बीडमधील महिला पोलिस कॉन्स्टेबलची लिंग बदलासाठी सुट्टी

मुंबई/बीड : बीडमधील गुन्हेगारीचा आलेख काही कमी नाही. त्यामुळे या ना त्या कारणांमुळे बीड पोलिस नेहमीच चर्चेत असतात. पण यावेळी मात्र बीड पोलिस दल चर्चेत आहे ते एका महिला कॉन्स्टेबलमुळे. या महिला कॉन्स्टेबलला आपलं लिंग बदलायचं आहे. त्यामुळे आता बीड पोलिस राज्यात चर्चेचा विषय ठरले आहेत.

सुट्टी... सगळ्यांचा अगदी जिव्हाळ्याचा विषय. पण बीडच्या महिला पोलिस कॉन्स्टेबलनं ज्या कारणासाठी सुट्टी मागितली आहे, ते कारण ऐकून राज्याच्या गृह विभागात एकच खळबळ उडाली आहे. लिंग बदलण्यासाठी सुट्टी द्यावी असा अर्ज बीडचे पोलिस अधिक्षक आणि पोलिस महासंचालकांना करण्यात आला आहे.

23 जून रोजी मुंबईतल्या जेजे रुग्णालयात या महिला कॉन्स्टेबलची हार्मोन आणि शारीरिक चाचणी झाली. डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर 17 सप्टेंबर रोजी तिनं लिंग बदलण्यासाठी सुट्टीचा अर्ज केला. अशा कारणासाठी पहिल्यांदाच अर्ज आल्यानं त्यावर काय निर्णय घ्यावा या विचारात वरीष्ठ पोलीस अधिकारी आहेत.

तिची निवड महिला गटातून झाल्याने नोकरीवर पाणी सोडावे लागेल, असं पोलिस अधिक्षक कार्यालयातून सांगण्यात आलं आहे. मात्र लिंग बदलानंतर पुन्हा शारीरिक चाचणी घेऊन त्यांना पोलिसामध्ये राहता येईल, असं तिच्या वकिलांनी सांगितलं. अहमदाबादमध्येही अशी घटना घडल्याचा दाखला त्यांनी दिला.

सध्या पोलिस खात्यात या संपूर्ण प्रकारावर निर्णय घेताना वरिष्ठ अधिकारी कुठल्याच निर्णयापर्यंत पोहचू शकलेले नाहीत. त्यामुळे सुट्टीसाठीच्या या किचकट अर्जावर पोलिस खातं काय निर्णय घेतं, याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Beed Lady Police Constable applies leave for sex change operation latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV