ललिता म्हणून जन्मले, ललितकुमार म्हणून जगायचं आहे

सर्व प्रकरणाबद्दल मुख्यमंत्र्यांनी देखील सहानुभूतीपूर्वक विचार करण्याचे आदेश दिले असले, तरी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी मात्र तिला लिंगबदलासाठी अजून परवानगी दिलेली नाही.

ललिता म्हणून जन्मले, ललितकुमार म्हणून जगायचं आहे

बीड : ललिता म्हणून जन्माला आले असले, तरी आता ललितकुमार म्हणून समाजात जगायचं आहे, अशी इच्छा लिंग परिवर्तनासाठी प्रयत्न करणारी महिला पोलिस ललिताने व्यक्त केली.

ललिताच्या लिंगबदलाचा प्रवास 2014 मध्ये सुरु झाला. त्यावेळी ललितच्या लग्नाचा विषय सुरु होता, मात्र तिला शरीरात पुरुषांचे गुणसूत्र असल्याची जाणीव झाली. कुटुंबीयासोबत ती बीडच्या खाजगी रुग्णालयात तपासणीसाठी आली. तेव्हा ललिताच्या रिपोर्टमध्येही तिच्या शरीरात पुरुषांचे गुणसूत्र असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.

कालांतराने ललिताच्या शरीरामध्ये विशेष बदल झाल्याचं दिसून आलं आणि तिने डॉक्टरांच्या सल्ल्याने यावर उपचार करण्यासाठी थेट मुंबईचं जेजे रुग्णालय गाठलं. लिंग परिवर्तन करण्यासाठी माहिती घेण्यास सुरुवात केली. या सर्व प्रवासात ललिताला मोठा संघर्ष करावा लागला.

जे जे रुग्णालयात ललिताच्या लिंगपरिवर्तनासाठी तीच मेडिकल चाचणी करण्यात आली आणि त्याचा रिपोर्ट पोलिस महासंचालकांकडे पाठवण्यात आला.

या सर्व प्रकरणाबद्दल मुख्यमंत्र्यांनी देखील सहानुभूतीपूर्वक विचार करण्याचे आदेश दिले असले, तरी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी मात्र तिला लिंगबदलासाठी अजून परवानगी दिलेली नाही.

ललिता अतिशय गरीब कुटुंबात जन्माला आली आहे. त्यामुळे तिची पोलिसाची नोकरीच तिच्या कुटुंबाचा आधार आहे. त्यामुळे ती नोकरीत राहून लिंग परिवर्तनाची परवानगी मागत आहे.

संबंधित बातम्या


'मॅट'कडे दाद मागा, लिंगबदल सुट्टीसाठीच्या याचिकेवर हायकोर्टाचे निर्देश


लिंगबदलानंतरही नोकरीत कायम ठेवा, महिला पोलिस कॉन्स्टेबल हायकोर्टात


‘त्या’ महिला कॉन्स्टेबलचा सहानुभूतीपूर्वक विचार करा : मुख्यमंत्री


बीडमधील महिला पोलिस कॉन्स्टेबलची लिंग बदलासाठी सुट्टी

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Beed : Lady Police who appealed for sex change operation says she wants to live like a man latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV