पुतणीला टाकीत बुडवून मारल्यानंतर भावजयीला विहिरीत ढकललं!

भावजय पोहून वर आली असता तिच्या गळ्यावर पाय ठेवून विष पाजलं. बीडच्या धारुर तालुक्यातील असोला इथे हा क्रूर प्रकार उघडकीस आला आहे.

पुतणीला टाकीत बुडवून मारल्यानंतर भावजयीला विहिरीत ढकललं!

बीड : चुलत भावाशी झालेल्या भांडणाचा बदला घेण्यासाठी चुलत्याने अवघ्या दीड वर्षाच्या पुतणीला पाण्याच्या टाकीत बुडवून मारलं. त्यानंतर भावजयीला विहिरीत ढकलून दिलं.

भावजय पोहून वर आली असता तिच्या गळ्यावर पाय ठेवून विष पाजलं. बीडच्या धारुर तालुक्यातील असोला इथे हा क्रूर प्रकार उघडकीस आला आहे.

राहीबाई वसंत चोले यांच्या फिर्यादीनुसार, शनिवारी त्यांचा मुलगा धनराज आणि पुतण्या प्रवीण यांच्यात दारु पिण्यावरुन भांडण झालं. सोमवारी दुपारी एक वाजता राहीबाई शेतात सोयाबीन काढण्यासाठी गेल्या होत्या.

तर दुपारी तीन वाजता सोनाली तिची दीड वर्षांची मुलगी जनाला घेऊन शेताकडे निघाली असता, आरोपी प्रवीणने तिला अडवलं. जनाला हिसकावून घेत शेतातील पाण्याच्या टाकीमध्ये बुडवून मारले आणि बांधावर टाकून दिलं.

त्यानंतर सोनालीला विहिरीत ढकललं. मात्र, ती पोहून वर आली असता प्रवीणने तिच्या गळ्यावर पाय देऊन तिला विष पाजले आणि पळून गेला.

संध्याकाळी राहीबार्इंना कोळपिंपरी शिवारातील एका बांधावर सोनाली पडलेली आढळली. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. तिच्यावर सध्या अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

या प्रकरणी आरोपी प्रवीण राजाभाऊ चोलेवर खुनाचा गुन्हा नोंदवून त्याला अटक करण्यात आली आहे.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Beed : Man killed his niece and pushed sister in law in the well
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV