शहीद जवानाला मानवंदना द्यायला जाणाऱ्या जवानांना अपघात

चंदीगडमध्ये शहीद झालेले जवान मुरलीधर शिंदे यांना मानवंदना देण्यासाठी बीएसएफची गाडी अहमदनगरहून परळीला निघाली होती.

शहीद जवानाला मानवंदना द्यायला जाणाऱ्या जवानांना अपघात

बीड : बीड-परळी महामार्गावर बीएसएफ जवानांच्या गाडीला अपघात झाला. शहीद जवानाच्या अंत्यसंस्काराला जाताना हा अपघात घडला असून नऊ जवान जखमी झाले आहेत.

चंदीगडमध्ये शहीद झालेले जवान मुरलीधर शिंदे यांना मानवंदना देण्यासाठी बीएसएफची गाडी अहमदनगरहून परळीला निघाली होती. या गाडीत एकूण 15 जवान होते. तेलगावजवळ आज दुपारी दोन वाजताच्या सुमारास त्यांच्या गाडीला अपघात झाला.

दिंद्रुडजवळ संगम फाट्यावर असताना गाडीचे ब्रेक फेल झाले.  अपघातात तीन जवान गंभीर जखमी झाले असून 6 जवान किरकोळ जखमी आहेत.

जखमी जवानांना तातडीनं बीडच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Beed Parali Road BSF Army men accident latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV