टेक्स्टाईल इंजिनिअरची विषमुक्त भाज्यांची शेती, तेजस्वी नाईकांची यशोगाथा

By: विलास अध्यापक, एबीपी माझा, बेळगाव | Last Updated: Wednesday, 11 January 2017 11:10 AM
टेक्स्टाईल इंजिनिअरची विषमुक्त भाज्यांची शेती, तेजस्वी नाईकांची यशोगाथा

बेळगाव : तेजस्वी नाईक, व्यवसायाने टेक्स्टाईल इंजिनिअर पण आता बेळगाव जवळच्या मोदगे गावी ते शेती करतात. त्यांनी मोठमोठ्या कंपन्यात नोकरी केली. त्यांच्या वडिलांची सिल्क फॅक्टरीही होती. ते सोडून शेती हा व्यवसाय का निवडला यामागे काही कारणं होती.

 

“वडिलांची कंपनी अडचणीत आली. त्यामुळे जागा विकावी लागली. त्यानंतर दुसरी जागा विकत घेतली, फॅक्टरी सुरु केली. पडिक जमिनीवर शेती करण्याचा निर्णय घेतला,” असं तेजस्वी नाईक सांगतात.

 

फॅक्टरी सोडून उरलेल्या जागेत तेजस्वी नाईक यांनी तुती लागवड सुरु केली. 1995 ते 2005 या काळात आपल्याकडील साडे आठ एकरात ऊस, रेशीम शेती आणि भाजीपाला शेती ते करत होते. आता जरी ते सर्व शेती सेंद्रीय पद्धतीने करत असले तरी सुरुवातीला रासायनिक खतं आणि कीडनाशकांचा वापर करायचे. त्याच काळात घडलेला एक प्रसंग तेजस्वी यांच्या शेती व्यवसायातील टर्निंग पॉईंट ठरला आणि  ते सेंद्रीय शेतीकडे वळले .

 

तेजस्वी नाईक म्हणाले की, “रेनवॉटर हार्वेस्टिंगमुळे पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध झालं. फ्लॉवरच्या आंतरपिकातून 50 ते 60 हजारांचा फायदा मिळाला. त्याची पानं तयार झाल्यावर ती कापून रेशीम किड्याला दिली. पण ते किडे मेले. कीटकनाशकांचा परिणाम असल्याचं जाणवलं. रेशीमचं एक वर्ष नुकसान झालं. तेव्हाच सेंद्रीय शेती करण्याचं ठरवलं.”

 

आज तेजस्वी नाईक साडे आठ एकरापैकी दीड एकरात भाजीपाला पिकवतात. बिनीस, नवलकोल, गाजर, टोमॅटो, कोथिंबीर, गवार, लाल मुळा, दोडकी, दुधी भोपळा, पालक, रताळी, मेथी, लाल भाजी, मिरची अशी भाजीपाला पिकं त्यांच्या शेतात आहे. भाजीपाल्यासाठी फक्त शेणखत, पालापाचोळ्याचे खत आणि चांगल्या वाढीसाठी जीवामृताची फवारणी केली जाते. दहा किलो गाईचे शेण, दहा लिटर गोमूत्र, दोन किलो गूळ, दोन किलो द्विदल धान्याचे पीठ आणि दोन किलो माती यांचे मिश्रण करुन सहा दिवस तसेच ठेवले जाते. सहा दिवसांनी तयार झालेले जीवामृत दोनशे लिटर पाण्यात घालून वापरता येते. जीवामृताची फवारणी केल्यामुळे किडीचा प्रादुर्भाव होत नाही आणि पिकाची वाढ चांगली होते असे तेजस्वी नाईक सांगतात.

 

सेंद्रीय पद्धतीने शेती केल्यामुळे खत आणि कीटकनाशकांचा खर्च वाचतो. सेंद्रीय पद्धतीने पिकविलेल्या भाजीची चव उत्कृष्ट असल्यामुळे भाजीपाल्याची मागणीही वाढली आहे, असं तेजस्वी नाईक सांगतात. या सेंद्रीय भाजीपाल्याला इतर पिकांच्या तुलनेत चांगला भाव मिळतो.

 

या दीड एकरातून महिन्याला सगळा खर्च वजा जाऊन पंचवीस हजारहून अधिक नफा मिळतो, असा त्यांचा अनुभव आहे. साडे आठ एकर शेतीतून किमान दहा ते बारा लाख रुपये नफा मिळत असला तरी विषमुक्त अन्नधान्य ग्राहकांपर्यंत पोहोचवतो याचं समाधान जास्त महत्त्वाचं असल्याचं तेजस्वी नाईक सांगतात.

 

पाहा व्हिडीओ

 

First Published: Wednesday, 11 January 2017 11:06 AM

Related Stories

 राज्यातील 19 हजार कृषी सेवा केंद्रांवर स्वाईप मशिन
राज्यातील 19 हजार कृषी सेवा केंद्रांवर स्वाईप मशिन

नवी दिल्ली : राज्यातील 19 हजार कृषी सेवा केंद्रावर स्वाईप मशिन सुविधा

शेतकऱ्यांना हवामान बदलाची मोफत माहिती मिळणार!
शेतकऱ्यांना हवामान बदलाची मोफत माहिती मिळणार!

मुंबई : राज्यभर स्वयंचलित हवामान केंद्र उभारणीच्या रखडेल्या

कोकणातील कोकम, नाशिकची वाईन आणि महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीला GI मानांकन
कोकणातील कोकम, नाशिकची वाईन आणि महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीला GI...

मुंबई : कोकणातील कोकम, नाशिकची वाईन आणि महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी आता

किसानपुत्रांचा एल्गार ! शेतकऱ्यांसाठी आज एकदिवसीय अन्नत्याग
किसानपुत्रांचा एल्गार ! शेतकऱ्यांसाठी आज एकदिवसीय अन्नत्याग

मुंबई : सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांना निषेध करण्यासाठी आज

‘युगांक’... 120 दिवसात येणाऱ्या कापसाच्या नव्या प्रजातीचा शोध!
‘युगांक’... 120 दिवसात येणाऱ्या कापसाच्या नव्या प्रजातीचा शोध!

नागपूर: कॉटन रिसर्च इन्स्टिट्यूटने एक आगळवेगळं संशोधन केलं आहे.

सदाभाऊ 7 वा. बांधावर, गारपीटग्रस्त शेतीचे 24 तासात पंचनामे
सदाभाऊ 7 वा. बांधावर, गारपीटग्रस्त शेतीचे 24 तासात पंचनामे

सोलापूर: अवकाळी पाऊस आणि गारपीटीनं नुकसान झालेल्या शेतीचे 24

दुग्ध व्यवसायातून दिवसाला 10 हजार कमावणारा शेतकरी!
दुग्ध व्यवसायातून दिवसाला 10 हजार कमावणारा शेतकरी!

धुळे : धुळे शहराजवळ बिलाडी शिवारात चंद्रकांत केले या प्रगतशील

शेतकऱ्यांच्या न्यायहक्कांसाठी एल्गार, 19 मार्चला राज्यव्यापी उपोषण
शेतकऱ्यांच्या न्यायहक्कांसाठी एल्गार, 19 मार्चला राज्यव्यापी उपोषण

मुंबई : शेतकऱ्यांविषयी सहवेदना व्यक्त करण्यासाठी आणि शेतकरीविरोधी

वडिलोपार्जित शेतीतून ST महामंडळातील अधिकाऱ्याचे 40 टन डाळिंबाचे उत्पादन
वडिलोपार्जित शेतीतून ST महामंडळातील अधिकाऱ्याचे 40 टन डाळिंबाचे...

  धुळे : एसटी महामंडळात नियंत्रक पदावर असलेले राजेंद्र देवरे यांची

राष्ट्रीय कृषी विमा योजनेतून शेतकऱ्यांना 893 कोटी रुपयांची नुकसान भरपाई
राष्ट्रीय कृषी विमा योजनेतून शेतकऱ्यांना 893 कोटी रुपयांची नुकसान...

मुंबई : रब्बी हंगाम 2015-16 मधील 8 अधिसूचित पिकांकरिता राबविण्यात