बेळगावचे तिळगुळाचे दागिने सातासमुद्रापार

बेळगावचे तिळगुळाचे दागिने सातासमुद्रापार

बेळगाव: बेळगावात तयार होणाऱ्या दागिन्यांना अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जर्मनी,कॅनडा आणि दुबईमध्ये मागणी आली आहे. हे दागिने सोन्याचांदीचे नसून तिळगुळाचे आहेत. प्राजक्ता बेडेकर यांनी तिळगुळापासून तयार केलेल्या लहान मुलांच्या आणि मोठ्यांच्या दागिन्यांना सातासमुद्रापलीकडून मागणी आली असल्यामुळे आपल्या मित्रपरिवारात तसेच नातेवाइकांच्यात त्या कौतुकाचा विषय ठरल्या आहेत .

प्राजक्ता बेडेकर यांनी आपल्या लहान मुलींसाठी म्हणून संक्रांतीच्यावेळी तिळगुळाचे दागिने स्वतः तयार केले. त्यांनी केलेले दागिने पाहून त्यांच्या मैत्रिणी आणि नातेवाईकांनी पुढच्या वर्षी आम्हालाही दागिने करून दे म्हणून मागणी केली. नंतर मैत्रिणी ,नातेवाईक यांच्याकडून त्यांच्या तिळगुळाच्या दागिन्यांना प्रसिद्धी मिळत गेली. आणि दरवर्षी संक्रांतीच्यावेळी प्राजक्ता यांना मिळणाऱ्या ऑर्डर वाढत गेल्या. यावर्षी पन्नासहून अधिक दागिन्यांच्या सेटची ऑर्डर मिळाली आहे.

Belgaum Tilgul ornaments

तिळगुळाचे दागिने तयार करताना त्यामध्ये सुबकता महत्वाची असते. लहान मुलांच्या कृष्णाच्या सेटमध्ये किरीट ,हार ,बाजूबंद ,बासरी आणि मनगटी असतात. राधाच्या सेटमध्ये बिंदी ,बाजूबंद ,बांगड्या ,कमरपट्टा ,नेकलेस ,तन्मणी असते. नवविवाहित जोडप्याचे देखील तिळगुळाचे दागिने घालून फोटो काढण्याची पद्धत आहे . मोठ्यांच्या कृष्णाच्या सेटमध्ये हार ,सुदर्शन चक्र ,किरीट ,ब्रेसलेट ,अंगठी यांचा समावेश असतो . रुक्मिणीच्या सेटमध्ये बिंदी ,चिंचपेटी ,छल्ला ,मेखला ,वेणी ,नेकलेस ,तन्मणी ,नथ ,मंगळसूत्र ,बांगड्या आणि कमरपट्टा असतात .

Belgaum Tilgul ornaments 3

तिळगुळाच्या दागिन्यांची किंमत ३०० रुपयांपासून ३००० रु . पर्यंत आहे . दागिने करताना भारतीय आणि पाश्चात्य पद्धतीचे दागिने करण्यावर भर दिल्यामुळे, एक प्रकारची नाविन्यता दागिन्यांमध्ये आली आहे .

तिळगुळ ओवून दागिने तयार करावे लागतात. दोन तिळगुळात समान अंतर राखणे हे मोठे कौशल्याचे काम असते. बाजारात मिळणाऱ्या तिळगुळाच्या दागिन्यांना स्टेपलर पिना मारलेल्या असतात पण लहान मुलांना त्या पिना लागण्याची भीती असते. म्हणून मी सारे काम दोऱ्याची हातशिलाई करून करते ,असे प्राजक्ता बेडेकर यांनी आपल्या दागिने तयार करण्याच्या अनुभवा विषयी सांगितले.

लाईफस्टाईल शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV