बेळगावात शेकोटीत भाजून सुरक्षारक्षकाचा मृत्यू

प्रभाकर पुकळेकर असं मृत सुरक्षारक्षकाचं नाव आहे.

बेळगावात शेकोटीत भाजून सुरक्षारक्षकाचा मृत्यू

बेळगाव : बेळगावमधील उधमबाग पोलिस स्थानकाच्या बाजूलाच असलेल्या एक फॅक्टरीत, आगीच्या शेकोटीत भाजून सुरक्षारक्षकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आली आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी घडलेल्या या दुर्दैवी घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.

प्रभाकर पुकळेकर असं मृत सुरक्षारक्षकाचं नाव आहे. थर्टी फर्स्टच्या रात्री केलेल्या शेकोटीत भाजून त्यांचा अंत झाला. या फॅक्टरीचा गेट बंद असल्याने तिथे कुणीच गेलं नाही, त्यामुळे नववर्षाला ही घटना उघडकीस आली आहे.

त्याहून वाईट गोष्ट म्हणजे सुरक्षारक्षकाच्या जळालेल्या मृतदेहाचे रात्रीच्या वेळी कुत्र्यांनी लचके तोडल्याचा प्रकार घडला आहे.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Belgoan : Security guard dies after falling into bonfire
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV