पुणे-गुंडेगाव बस सेवा बंद, भापकर गुरुजींचा आत्मदहनाचा इशारा

गेल्या 15 दिवसांपासून काहीही न सांगता पुणे-गुंडेगाव ही बस सेवा बंद करण्यात आली. यामुळं आता ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

पुणे-गुंडेगाव बस सेवा बंद, भापकर गुरुजींचा आत्मदहनाचा इशारा

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातल्या गुंडेगाव ते पुणे दरम्यान सुरु असलेली बस पुन्हा सुरु न झाल्यास आत्मदहन करेन. असा इशारा महाराष्ट्राचे ‘मांझी’ म्हणून ओळख असलेल्या भापकर गुरुजींनी दिला आहे.

भापकर गुरुजींनी स्व-खर्चातून डोंगरातून वाट काढत गावात रस्ता तयार केला. एसटी महामंडळाकडं वारंवार पाठपुरावा करुन गुंडेगाव ते पुणे ही बससेवा सुरु केली. मात्र, गेल्या 15 दिवसांपासून काहीही न सांगता ही बससेवा बंद करण्यात आली. यामुळं आता ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

ही बससेवा ताबडतोब सुरु करावी अशी मागणी भापकर गुरुजींनी केली आहे. असं न झाल्यास आपण रास्ता रोको करु आणि वेळ पडल्यास आत्मदहनही करु. असा इशारा भापकर गुरुजींनी दिला आहे. भापकर गुरुजींच्या या इशाऱ्यानंतर आता एसटी महामंडळानं ही बससेवा सुरु करण्याचं आश्वासन दिलं आहे.

कोण आहेत भापकर गुरुजी?

राजाराम भापकर गुरुजींचं वय वर्षे 88 आहे. त्यांनी आयुष्यभराची जमापुंजी खर्च करुन गुरुजींनी गावात रस्ते तयार केले. माझानं त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना माझा सन्मान पुरस्कारानं सन्मानित केलं.

महाराष्ट्राच्या या मांझीची ओळख ‘एबीपी माझा’ने जगाला करुन दिली होती.

संबंधित बातम्या :

महाराष्ट्राच्या मांझीवर हल्ला, भापकर गुरुजींना गावगुंडांची मारहाण


महाराष्ट्राच्या मांझीचं यश, गुंडेवाडी ते पुणे थेट बससेवा

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Bhapkar Guruji’s Protest against ST bus service
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV