सापाला बाहेर काढण्यासाठी लावलेल्या आगीत गोडाऊन जळून खाक

दुपारी चार ते पाचच्या दरम्यान लागलेली ही आग आटोक्यात आणण्यासाठी फायर ब्रिगेडला गोदामाच्या भिंती देखील फोडाव्या लागल्या.

सापाला बाहेर काढण्यासाठी लावलेल्या आगीत गोडाऊन जळून खाक

धुळे : सापाला गोडाऊनमधून बाहेर काढण्यासाठी लावलेल्या आगीत टायरचे गोडाऊन जळून खाक झाल्याची घटना धुळे शहरातील बिलाडी रोडवर घडली आहे.

दुपारी चार ते पाचच्या दरम्यान लागलेली ही आग आटोक्यात आणण्यासाठी फायर ब्रिगेडला गोदामाच्या भिंती देखील फोडाव्या लागल्या. अखेर तीन तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली.

सुदैवानं या घटनेत कोणीही जखमी झालं नाही. आगीच्या धुराचे लोट दूरपर्यंत पसरले होते. या आगीच्या घटनेत किमान सात लाखाचे विविध कंपन्यांचे टायर जळून खाक झाले आहेत.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: big fire tire Godown in Dhule
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV