पुण्यासोबत जळगावातही गाड्यांची अज्ञातांकडून तोडफोड

बिबवेवाडी गावठाण परिसरात काल रात्री अज्ञातांनी तीन गाड्या फोडल्याची घटना घडली. तर जळगावमध्ये तीन दुचाकी अज्ञाताने जाळल्याची घटना समोर आली आहे.

पुण्यासोबत जळगावातही गाड्यांची अज्ञातांकडून तोडफोड

 

पुणे/ जळगाव : पुण्यातल्या गाड्यांच्या तोडफोडीचं सत्र अजूनही सुरुच आहे. बिबवेवाडी गावठाण परिसरात काल रात्री अज्ञातांनी तीन गाड्या फोडल्याची घटना घडली. तर जळगावमध्ये तीन दुचाकी अज्ञाताने जाळल्याची घटना समोर आली आहे.

गेल्या आठवड्यातही पुण्यातील सहकारनगर परिसरात गाड्यांचे सीट कव्हर फाडण्यात आले. तर वारजेतही अशाच प्रकारची घटना 8-10 दिवसांपूर्वी घडली होती.

त्यातच आज बिबवेवाडी गावठाण परिसरात काल अज्ञातांनी तीन गाड्या फोड्याची घटना समोर आली.  त्यामुळे कुणीतरी अशा घटनांना खतपाणी घालत दहशत पसरवण्याता प्रयत्न करत आहे.

दुसरीकडे जळगावातल्या चोपडा शहरातही एका अज्ञातानं तीन दुचाकी गाड्यांची जाळपोळ केली, तर ओमनी कारच्या काचा फोडल्या आहेत. दरम्यान हा प्रकार मद्यधुंद तरुणांनी केल्याचा अंदाज जळगाव पोलीस व्यक्त करत आहेत.

दरम्यान, पुणे पोलिसांकडून वाहनांच्या जाळपोळ, तोडफोडीच्या घटनांकडे मोठ्या प्रमाणावर दुर्लक्ष होत असल्याची भावना पुणेकरांनी व्यक्त केली आहे.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: bike tofod in pune and jalgaon latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV