'पोल्ट्रीतील ब्रॉयलर पक्षी पूर्णपणे सुरक्षित'

By: संदीप रामदासी, एबीपी माझा मुंबई | Last Updated: Wednesday, 11 January 2017 11:33 PM
'पोल्ट्रीतील ब्रॉयलर पक्षी पूर्णपणे सुरक्षित'

फाईल फोटो

मुंबई: गुजरातच्या सीमेवरील दीव-दमणच्या कडैया गावात बर्ड फ्लूची लागण झाल्याचे वृत्त ऐकून अनेक पोल्ट्रीचालक शेतकरी हैराण झाले आहेत. पण गुजरातमधील दमण भागातील बर्ड फ्लूची लागण ही बदकांमध्ये आढळल्याचे समोर येत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी घाबरुन जाण्याचे कारण नाही.

शिवाय, पोल्ट्रीतील ब्रॉयलर पक्षी हा पूर्णपणे सुरक्षित आहे, असा निर्वाळा गुजरात फार्मर्स कोऑर्डिनेशन कमिटीचे अध्यक्ष अन्वेष पटेल यांनी दिला आहे.

दमन जिल्ह्यातील कडैया गाव हे बाधित क्षेत्र म्हणून स्थानिक प्रशासनाने जाहीर केले आहे. संपूर्ण दमन जिल्हा ‘देखरेख झोन’ म्हणून घोषित करण्यात आला आहे. या व्यतिरिक्त कुठेही काहीही कारवाई झालेली नाही. संपूर्ण गुजरातमध्ये जेथे जेथे व्यापाऱ्यांची अडवणूक वा दुकाने बंद करण्याचे आदेश आले, त्या ठिकाणी गुजरात फार्मर्स कमिटीने संवाद साधून संबंधित कारवाई मागे घेण्यास भाग पाडले आहे, असे पटेल यांनी सांगितले.

दरम्यान, गुजरात आणि महाराष्ट्रात काही माध्यमांमधून विपर्यस्त वृत्त आल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. अशा परिस्थितीत बाजार भाव पडून आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते. सध्याच्या घटनेत घाबरण्यासारखे काहीही नाही. नेहमीसारखा बाजार सुरळीत असून, थंडीमुळे चिकन आणि अंडयांना जोरदार मागणी आहे. त्यामुळे पॅनिक सेलिंग करु नये, असे आवाहन पटेल यांनी केले.

First Published: Wednesday, 11 January 2017 11:31 PM

Related Stories

खडसेंविरोधातील तक्रारीची चौकशी का नाही, हायकोर्टाचा सवाल
खडसेंविरोधातील तक्रारीची चौकशी का नाही, हायकोर्टाचा सवाल

मुंबई : पुणे येथील भोसरीतील भूखंडाप्रकरणी माजी मंत्री एकनाथ खडसे

जळगावच्या निशा पाटीलचा शौर्य पुरस्काराने सन्मान
जळगावच्या निशा पाटीलचा शौर्य पुरस्काराने सन्मान

नवी दिल्ली : जळगाव जिल्ह्यातील भडगाव येथील निशा पाटील या

भाजप हा गुंडाचा पक्ष : अजित पवार
भाजप हा गुंडाचा पक्ष : अजित पवार

पिंपरी : भाजपने आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. मात्र आता

अनामत रक्कम म्हणून चिल्लर, पैसे मोजताना कर्मचाऱ्यांच्या नाकीनऊ
अनामत रक्कम म्हणून चिल्लर, पैसे मोजताना कर्मचाऱ्यांच्या नाकीनऊ

नागपूर : ‘गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा’ या चित्रपटातील नायक मकरंद

अभिनेते सयाजी शिंदेंनी लावलेली झाडं अज्ञातांनी तोडली!
अभिनेते सयाजी शिंदेंनी लावलेली झाडं अज्ञातांनी तोडली!

सातारा: ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांनी वृक्षारोपण केलेल्या

राष्ट्रवादीचे माजी मंत्री बदामराव पंडित शिवसेनेत
राष्ट्रवादीचे माजी मंत्री बदामराव पंडित शिवसेनेत

मुंबई : निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीतून सुरु असलेलं

अकोल्यात आरोपीची पोलीस कोठडीत आत्महत्या
अकोल्यात आरोपीची पोलीस कोठडीत आत्महत्या

अकोला : अकोल्यात दुचाकी चोरी प्रकरणातील आरोपीचा उपचारादरम्यान

एटीएममधून आजपासून दरदिवशी दहा हजार रुपये काढता येणार
एटीएममधून आजपासून दरदिवशी दहा हजार रुपये काढता येणार

मुंबई : एटीएममधून दरदिवशी काढता येणाऱ्या रकमेची मुदत आजपासून दहा

आर्ची बसलेल्या 'त्या' झाडाची फांदी तुटली, सोशल मीडियावर हळहळ
आर्ची बसलेल्या 'त्या' झाडाची फांदी तुटली, सोशल मीडियावर हळहळ

करमाळा (सोलापूर) : ‘सैराट’ चित्रपटामुळे आर्ची-परशासह लहानमोठे

LIVE : पारदर्शी अजेंड्यावर मुख्यमंत्री, उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा होणार: सूत्र
LIVE : पारदर्शी अजेंड्यावर मुख्यमंत्री, उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा...

हेडलाईन्स   पारदर्शी अजेंड्याबाबत मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे