भाजपला राहुल गांधींची भीती वाटतेय : शरद पवार

त्यामुळे सीबीआयच्या माध्यमातून बोफोर्स प्रकरणाचा ठपका ठेवण्याचा केंद्र सरकार प्रयत्न करत असल्याचा थेट आरोप शरद पवार यांनी केला आहे.

भाजपला राहुल गांधींची भीती वाटतेय : शरद पवार

चंद्रपूर : भाजप सरकारला राहुल गांधींची भीती वाटत असल्याने बोफर्स प्रकरणं पुन्हा उकरुन काढलं जात असल्याचं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. ते चंद्रपुरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते.

सरकारला राहुल गांधींची धास्ती वाटू लागली आहे. त्यामुळे सीबीआयच्या माध्यमातून बोफोर्स प्रकरणाचा ठपका ठेवण्याचा केंद्र सरकार प्रयत्न करत असल्याचा थेट आरोप शरद पवार यांनी केला आहे. यासाठी भाजप सरकार सत्तेचा गैरवापर करत असल्याची टीकाही पवारांनी यावेळी केली.

"गांधी कुटुंबाचं योगदान लक्षात न ठेवता, तुम्ही त्यांच्याबद्दल जुनं काहीतरी रेकॉर्ड काढून त्यांची बदमानी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. याचा अर्थ एकच आहे, या सरकारला बहुतेक राहुल गांधींची चिंता वाटायला लागली आहे. राहुल गांधींच्या भीतीने त्या कुटुंबाला पुन्हा एकदा बदनाम करता येईल का, या प्रकारची भावना सरकारची आहे," असं पवार म्हणाले.

पाहा व्हिडीओ

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: BJP government is afraid of Rahul Gandhi : Sharad Pawar
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV