पक्षाचा वटवृक्ष करणारेच आज उन्हात, खडसेंची घुसमट पुन्हा बाहेर

पक्षाचा वृक्ष वाढवून वटवृक्ष करणारे आज बाहेर उन्हात बसले आहेत, अशा शब्दांत एकनाथ खडसेंनी पुन्हा आपली नाराजी व्यक्त केली.

पक्षाचा वटवृक्ष करणारेच आज उन्हात, खडसेंची घुसमट पुन्हा बाहेर

जळगाव : पक्षाचा वृक्ष वाढवून वटवृक्ष करणारे आज बाहेर उन्हात बसले आहेत, अशा शब्दांत एकनाथ खडसेंनी पुन्हा आपली नाराजी व्यक्त केली. काल जळगाव जिल्ह्यातल्या बोदवड इथं मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेच्या कोणशिला प्रसंगी खडसे बोलत होते.

"आपल्यावरच्या आरोपांवर सरकारला पुरावे मिळाले का, याचं उत्तर सरकारनं जाहीरपणे जनतेला द्यायला हवं, असाही पुनरुच्चार त्यांनी केला. तसेच ज्यांच्यासाठी लाठ्या-काठ्या खाल्ल्या, तोच आज बाहेर आहे," असंही ते यावेळी म्हणाले.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी जळगाव जिल्ह्यातील रावेर इथं काँग्रेस कार्यकर्ते राजू पाटील यांच्या एकसष्टीचा सोहळा पार पडला. यावेळी एकनाथ खडसेंनी काँग्रेसच्या व्यासपीठावर हजेरी लावली. यावेळी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणही उपस्थित होते.

या कार्यक्रमातही बोलताना त्यांनी आपल्या मनातली खदखद जाहीर पणे बोलून दाखवली. “मी 40 वर्षांपासून पक्षाशी एकनिष्ठ आहे, पण पक्षानेच जर दूर केले तर माझ्यासमोर पर्याय उरणार नाही, असं एकनाथ खडसे यावेळी म्हणाले होते.

नेमकं काय म्हणाले एकनाथ खडसे?


संबंधित बातम्या

भाजप सोडण्याचा विचार नाही, पण पर्याय काय?: एकनाथ खडसे

एकनाथ खडसेंचं काँग्रेसमध्ये स्वागतच : अशोक चव्हाण

पुनर्वसन विस्थापितांचं होतं, खडसे प्रस्थापित नेते : फडणवीस

काँग्रेसमध्ये येणार का? ऑफरला एकनाथ खडसेंचं भावूक उत्तर

तुम्ही मुख्यमंत्र्यांसोबतच राहणार का? उत्तर देताना खडसे अडखळले...

एकनाथ खडसेंबाबत झोटिंग समितीचा अहवाल निरर्थक : मुख्यमंत्री

एकनाथ खडसेंच्या परतीचे दरवाजे बंद?

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: bjp leader eknath khadse expressed displeasure
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
अधिक माहिती: BJP eknath khadse एकनाथ खडसे भाजप
First Published:

Related Stories

LiveTV