भाजप आमदारावर पैसे मागितल्याचा आरोप, कथित ऑडिओ क्लीप व्हायरल

यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी केळापूरचे भाजप आमदार राजू तोडसाम यांनी एका ठेकेदाराकडून अप्रत्यक्षरित्या लाच मागितल्याची कथित ऑडिओ क्लीप सोशल मीडियावर सध्या व्हायरल झाली आहे.

भाजप आमदारावर पैसे मागितल्याचा आरोप, कथित ऑडिओ क्लीप व्हायरल

यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी केळापूरचे भाजप आमदार राजू तोडसाम पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलेत आहेत. त्यांनी एका ठेकेदाराकडून अप्रत्यक्षरित्या लाच मागितल्याची कथित ऑडिओ क्लीप सोशल मीडियावर सध्या व्हायरल झाली आहे. विशेष म्हणजे यात पालकमंत्री मदन येरावार यांच्या नावाचाही उल्लेख आहे.

यासंदर्भात आम्ही आमदार राजू तोडसाम यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. पण अद्याप त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही.

दरम्यान, ठेकेदारानं भाजपच्या आमदारावर थेट लाचखोरीचा आरोप केल्यानंतरआमदार साहेबांवर काय कारवाई होते हे पाहणं महत्वाचं आहे.

कथित ऑडिओ क्लीप : आमदार आणि ठेकेदारामधील संभाषण जसंच्या तसं

भाजप आमदाराची लाचखोरी?, कथित ऑडिओ क्लिप व्हायरल

आमदार : हॉलो शर्माजी... मी आमदार राजू तोडसाम

ठेकेदार : हा बोला साहेब....

आमदार : फोन अशासाठी केला की, तुमची कामं व्यवस्थिती झाली वाटतं, मी मारली चक्कर, तुमची कामं चांगली झाली.

ठेकेदार : हो साहेब...

आमदार : बिल पण निघलं वाटतं पूर्ण?

ठेकेदार : नाही बिल नाही निघालं अजून थोडं बाकी आहे.

आमदार : थोडं बाकी आहे का?

ठेकेदार : हा थोडा बाकी है...

आमदार : निकालना नही क्या फिर?

ठेकेदार : निकालना है साहेब...

आमदार : फिर अधिकारी कुछ बोले नही क्या मेरे बारेमे?

ठेकेदार : अभी कुछ बोले नही..

आमदार : नही बोले का? हा फिर अभी बोलेंगे मेरे बारेमे.. ये बिल निकालेनेके पहले बोलेंगे...

काम होगा की नही.

ठेकेदार : अरे सर तुम्हाला मी काय सांगू... माझ्या मुलाचा अपघात झाला आहे. सात महिन्यापासून मुलगा कोमात आहे. पुण्यात त्याचा अपघात झाला. मी परेशान आहे. हवं तर मी तुमच्या भागात काम करणार नाही. हवं तर मी मदनभाऊंना सांगतो.

आमदार : मदनभाऊ कशाला सीएम साहेबांना सांगतो. मला मदनभाऊची धमकी देता का?

ठेकेदार : मदनभाऊला सांगतो मी, त्यांनी जर सांगितलं तर मी करतो.

आमदार : तुम्ही आमच्या एरियात काम करता.

ठेकेदार : काम कितीचं आहे हे तुम्हालाही माहिती आहे.

आमदार : काम कसं करता ते माहिती ना... लगावू को क्वॉलिटी कंट्रोलको...

ठेकेदार : क्वॉलिटी कंट्रोलका रिपोर्ट दिया है.

आमदार : ओ काम तो तुम चालाखीसे करते हो.

ठेकेदार : चालाखीसे काम नही करते, ये हर चीजके लिये पैसे बाटेंगे तो अपनेको घर बेचना पडेगा. ये बात मे पेपरवालो को देता हूँ... मदन भाऊके पास जाता हूँ... साहेबांना सांगतो तुम्ही धमकी देता.

आमदार : धमकी नाही देत...

ठेकेदार : मग मला काय सांगता? माझ्या एरियात काम नाही करायचं म्हणून... एरिया खरेदी केला का तुम्ही?

ओ शर्माजी धमकी नाही देत... काम नीट करा.

ठेकेदार : काम चांगलंच केलं आहे. उगाचच अधिकारी पेमेंट देत नाही मला... तुम्हाला पैसे दिलं तर सगळं बरोबर आणि पैसे नाही दिले तर कामाची क्वॉलिटी बरोबर नाही.

आमदार : मला काही फरक नाही पडत...

VIDEO :

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV