खासदार नाना पटोले भाजपमधील सर्व नाराज नेत्यांची मोट बांधणार

भाजपमधल्या सर्व नाराज नेत्यांची मोट बांधून पुण्यात संमेलन घेणार असल्याची माहिती नाना पटोले यांनी एबीपी माझाला दिली आहे.

खासदार नाना पटोले भाजपमधील सर्व नाराज नेत्यांची मोट बांधणार

नागपूर : भाजप खासदार नाना पटोले यांनी पुन्हा एकदा भाजपविरोधातच दंड थोपटले आहेत. येत्या 15 तारखेला भाजपमधल्या सर्व नाराज नेत्यांची मोट बांधून पुण्यात संमेलन घेणार असल्याची माहिती नाना पटोले यांनी एबीपी माझाला दिली आहे.

नाना पटोले उद्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे भेटीसाठी वेळ मागितली आहे. शिवाय ते काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचीही भेट घेणार आहेत. 10 दिवसांपूर्वी नाना पटोले यांनी नाराजी व्यक्त करणारं पत्र मोदींना लिहिलं होतं. पण त्यानंतरही कोणताही प्रतिसाद न आल्याने आपण हे पाऊल उचलत असल्याचं पटोले यांनी स्पष्ट केलं आहे.

यापूर्वीही नाना पटोलेंचा भाजपला घरचा आहेर

नाना पटोले यांनी शेतकरी कर्जमाफीवरुन सरकारवर हल्लाबोल केला होता. राज्य सरकारने सप्टेंबरपर्यंत कर्जमाफीसंदर्भात ठोस पावलं उचलावी अन्यथा आपण इतिहासाची पुनरावृत्ती करु शकतो, असं म्हणत नाना पटोले यांनी अप्रत्यक्षपणे राजीनाम्याचे संकेत दिले. पटोले यांनी 2009 मध्ये काँग्रेसमध्ये असताना कर्जमाफीच्या मुद्द्यावर स्वपक्षीयांवर हल्लाबोल करत आमदारकीचा राजीनामा दिला होता.

नोटाबंदी आणि जीएसटीवरुन भाजप खासदार नाना पटोले यांनी त्यांच्याच पक्षाला पुन्हा एकदा फैलावर घेतलं. नोटाबंदी आणि जीएसटीमुळे व्यापाऱ्याचं कंबरडं मोडलं आहे. तर शेतकरीही अडचणीत आहेत. त्यामुळे व्यापारी, शेतकरी आणि बेरोजगारांसाठी वेगळी चळवळ उभी करण्याचं नाना पटोले यांनी दसऱ्याच्या दिवशी बोलताना जाहीर केलं होतं.

संबंधित बातम्या :

तर इतिहासाची पुनरावृत्ती होईल, नाना पटोलेंचे राजीनाम्याचे संकेत


फडणवीस सरकार राष्ट्रवादीच्याच पाठिंब्यावर सत्तेत: नाना पटोले


पेट्रोल दरवाढ : भाजप खासदार नाना पटोले दिल्लीत जाब विचारणार


चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य चीड आणणारं: नाना पटोले


चुकीच्या गोष्टींवर बोट ठेवणं म्हणजे पक्षाला विरोध नव्हे : नाना पटोले


 

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: BJP MP nana patole to meet Udhhav thackeray
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
अधिक माहिती: Nana patole नाना पटोले
First Published:

Related Stories

LiveTV