नागपुरात अमित शाह आणि सरसंघचालकांची बैठक, साडे तीन तास चर्चा

त्रिपुरा, नागालँड आणि मेघालय या ईशान्येकडील राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने चांगलं यश मिळवलं. त्यानंतर अमित शाह लगेचच नागपुरात दाखल झाले.

नागपुरात अमित शाह आणि सरसंघचालकांची बैठक, साडे तीन तास चर्चा

नागपूर : ईशान्येकडील निवडणुकीत भाजपने घवघवीत यश मिळवल्यानंतर नागपुरात भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली. दोघांमध्ये साडे तीन तास चर्चा झाली. भेटीत नेमकी काय चर्चा झाली, याचा तपशील गुलदस्त्यात आहे.

त्रिपुरा, नागालँड आणि मेघालय या ईशान्येकडील राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने चांगलं यश मिळवलं. त्यानंतर अमित शाह लगेचच नागपुरात दाखल झाले.

याशिवाय या भेटीमागे आणखी एक कारण असल्याचा अंदाज लावण्यात येत आहे. तो म्हणजे, नागपुरात 9, 10 आणि 11 मार्चला संघ प्रतिनिधींची सभा होणार आहे. संघ परिवारातील सर्व प्रतिनिधी आणि संघटना या कार्यक्रमाला उपस्थिती लावतात. त्यामुळे भेटीमागचं हे एक कारण असल्याचं बोललं जात आहे.

ईशान्य भारतात मोदी लाट

2019 च्या लोकसभा निवडणुकीआधी ईशान्य भारतात मोदी लाट दिसून आली. त्रिपुरात तब्बल 25 वर्ष सत्तेत असणाऱ्या डाव्यांना धक्का देत जनतेने भाजपला बहुमत दिलं. तर नागालँडमध्येही भाजपने मुसंडी मारली. शिवाय मेघालयमध्ये सत्ताधारी काँग्रेसला जोरदार धक्का बसला.

त्रिपुरा राज्यातल्या 60 पैकी 43 जागांवर भाजप विजय मिळवला, तर डाव्यांना फक्त 16 जागांवर समाधान मानावं लागलं. गेल्या निवडणुकीत 10 जागा मिळवणाऱ्या काँग्रेसला यंदा त्रिपुरात खातंही उघडता आलं नाही.

मेघालयात मात्र काँग्रेसने चांगली कामगिरी करत 60 पैकी 21 ठिकाणी विजय मिळवला. माजी लोकसभा अध्यक्ष पी. ए. संगमा यांचे चिरंजीव कोरनाड संगमा यांच्या एनपीपी अर्थात नॅशनल पीपल्स पार्टीने या ठिकाणी 19 जागांवर विजय मिळवला. भाजपचे 2 तर इतरांचे 11 उमेदवार निवडून आले. मेघालयमध्येही भाजप समर्थित सरकार स्थापन केलं जाणार आहे.

नागालँडमध्ये भाजपने 60 पैकी 27, एनपीएफनेही 27 जागांवर विजय मिळवला. त्यामुळे नागालँडमध्येही एनडीएचं सरकार असणार आहे. ईशान्येकडील सिक्कीम, अरुणाचल प्रदेश आणि आसाम या राज्यांमध्ये अगोदरपासूनच एनडीएची सत्ता आहे. आणखी तीन राज्यांचा यामध्ये समावेश झाला आहे. ईशान्येकडील केवळ मिझोराम आता काँग्रेसकडे उरलं आहे.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: BJP president amit shah and mohan bhagvat meeting in Nagpur
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV